केएसबी लिमिटेडचे २०२४ च्या पहिल्या तिमाहीत वाढ आणि सातत्यासह घवघवीत यश
पुणे : पंप आणि व्हॉल्व्हच्या निर्मितीमध्ये अग्रणी असलेल्या केएसबी लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीच्या व्यवसायात वाढ आणि सातत्यासह घवघवीत यश दिसून आले आहे.
या निकालामध्ये प्रामुख्याने कंपनीचा या काळातील विक्री महसूल ५४४.२ कोटी रुपये असून मागील वर्षीच्या याच अवधीपेक्षा तो ११.२ टक्क्याने जास्त आहे. कंपनीला महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाकडून २५०० सोलर वॉटर पंपिंग सिस्टिमसाठी ६३ कोटी रुपयांच्या पीएम-कुसुम III योजनेअंतर्गत प्रशंसा पत्र प्राप्त झाले आहे. केएसबी सौदीकडून ११ कोटी रुपये मूल्याच्या डिसेलिनेशन प्रकल्पासाठी पहिली ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला जनरल इलेक्ट्रिककडून ४.१ कोटी रुपयांचा एफजीडी, आणि हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिडेटकडून एचजी पंपांसाठी ५.६ कोटी रुपये या प्रमुख ऑर्डर मिळाल्या. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील ऑर्डरने ५० कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे. कंपनीने केरळमधील कोची येथे ३३ व्या अखिल भारतीय डीलर कॉंफ्रेंसचे आयोजन केले होते. “वन टीम, वन ड्रीम” ही तिची संकल्पना होती. कंपनीला डन अँड ब्रॅडस्ट्रीट ‘ईएसजी लीडरशिप समिट २०२४’ मध्ये ‘ईएसजी चॅम्पियन ऑफ इंडिया २०२४‘ पुरस्कार मिळाला. कंपनीने मुंबई आणि जयपूर येथे नूतनीकरण केलेल्या कार्यालयांचे उद्घाटन केले तसेच भुवनेश्वरमधील नवीन कार्यालयाचे स्थान निश्चित केले.
आर्थिक वर्ष २०२४ च्या तिमाही कामगिरीचा सारांश सांगताना केएसबी लिमिटेडच्या विक्री व विपणन विभागाचे उपाध्यक्ष श्री प्रशांत कुमार म्हणाले, “या तिमाहीत आम्ही विक्री महसुलात सातत्याने वाढ नोंदवली असून मागील आर्थिक वर्ष २०२३ तिमाहीच्या तुलनेत ती ११.२ टक्के जास्त आहे. आण्विक प्रकल्प क्षेत्रातील हलक्या पाण्याच्या वापराच्या क्षेत्रात आम्ही अलीकडेच पदार्पण केले आहे. त्यातून आमच्या चालू असलेल्या विस्ताराच्या प्रयत्नांवर प्रकाश पडतो. आमच्या सोलर सेगमेंटमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. त्यामुळे चांगल्या आणि शाश्वत उपाया सादर करणाऱ्या भविष्याकडे आम्ही पुढे जात आहोत.
कंपनीची वार्षिक डीलर कॉन्फरन्स नुकतीच कोची येथे झाली. तिथे आम्ही १५० पेक्षा अधिक वितरकांचे आयोजन केले होते. ही कॉन्फरन्स खूपच यशस्वी झाली आणि तिथे आम्ही स्टार परफॉर्मर्स निश्चित करून त्यांना पुरस्कृत केले. आम्ही २०२४ साठी आमचा दृष्टिकोनही मांडला आणि आमची शाश्वत भागीदारी बळकट केली.
केएसबीने आर्थिक वर्ष २०२४ ची दमदार आणि आणि आत्मविश्वासाने सुरूवात केली आहे. सर्व भागधारकांसाठी उत्कृष्टता, टिकाऊपणा आणि चिरस्थायी मूल्य निर्माण करण्यासाठी आम्ही आशावादी आणि वचनबद्ध आहोत.”
