Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला प्रचारात उतरविण्याची गरज का? रुपाली चाकणकरांची सुळे यांच्यावर टीका

पुणे : खासदार म्हणून १५ वर्षे काम केल्यानंतर स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर आणि त्याचीही मोठ्या प्रमाणात जाहिरात केल्यानंतर प्रचारासाठी आपल्या वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला प्रचारात उतरविण्याची गरज का भासली,’ अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली. ‘सध्या प्रचारात संपूर्ण कुटुंब उतरले असून, घरात आणखी कोणी राहिले असेल, तर त्यांनाही प्रचारात उतरवाल,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चाकणकर यांनी सुळे यांचे नाव न घेता टीका केली. या वेळी माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, पुष्कर तुळजापूरकर आणि हेमंत लेले उपस्थित होते.

पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या, मोदी सरकारने देशातील महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे महिलांचे सबलीकरण, सशक्तीकरण आणि आर्थिक सक्षमीकरण झाले आहे.

‘उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये गॅस कनेक्शन पोहचवले. महिलांसाठी विविध साह्य करणाऱ्या योजना देशभरात सुरू झाल्या आहे. महिला कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक पाठबळ योजना, लेक लाडकी योजनेद्वारे महिला सक्षमीकरणासाठी पाठबळ दिले गेले. चौथ्या महिला धोरणानुसार महिलेचे नाव पाल्यांच्या नावापुढे दिले गेले, हा महिलांचा सन्मान आहे,’ असा दावाही चाकणकर यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading