Saturday, June 6, 2026
ENTERTAINMENTLatest News

द साबरमती रिपोर्ट राशी खन्ना आणि विक्रांत मॅसी स्टारर हा चित्रपट आता या दिवशी होणार रिलीज 

 विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ आता नव्या दिवशी रिलीज होणार असून याआधी ३ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता २ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. राशी ने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले ” २ ऑगस्ट रोजी ” द साबरमती रिपोर्ट ” च्या फाइल्स पुन्हा उघडणार”
 रंजन चंदेल दिग्दर्शित, ‘द साबरमती रिपोर्ट’ हा एक विचार करायला लावणारा सिनेमॅटिक अनुभव असणार आहे. 27 फेब्रुवारी 2002 रोजी राज्यातील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनांची कथा मांडतो यातून बघायला मिळणार आहे.
विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना, दोघेही त्यांच्या आकर्षक कामगिरीसाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखले जाणारे प्रतिभावंत अभिनेते या प्रकल्पात त्यांचा अभिनय दाखवण्यासाठी सज्ज होत आहेत. नवीन रिलीजची तारीख लॉक इन केल्यामुळे चाहते आता विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना यांच्या द साबरमती रिपोर्ट साठी उत्सुक आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading