Sunday, June 14, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची उमेदवारी रद्द, निवडणुकी आधीच भाजपचा पहिला विजय

सुरत : गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागांवर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मे रोजी मतदान होणार आहे. मात्र त्या आधीच भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना सुरत मधून बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने कॉँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द केल्याने मंतदानाआधीच भाजपने विजायाच खातं उखडलं आहे.  

सुरत लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल होती आणि अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आज, 22 एप्रिल होती. राज्यातील सुरत लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि भाजपसह एकूण 11 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 8 अपक्ष उमेदवारांनी अनपेक्षित रित्या माघार घेतली. तर केंद्रीय निवडणूक आयोगाने कॉँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरवला. त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. निवडणूक आयोगाने त्यांना विजयाचे प्रमाणपत्रही दिले आहे. लोकसभा निवडणुकीची ही पहिलीच वेळ आहे, की मतदानापूर्वीच एखादा उमेदवार विजयी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

 दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या कारवाईवर कॉँग्रेसने आक्षेप घेतला असून ही हुकूमशाही आहे असे म्हटंले आहे. तसेच लोकशाहीत जनतेला त्यांचा उमेदवार निवडण्यापासून वंचित ठेवणे, हा संविधाचा भंग असून ही पाऊले हुकूमशाहीकडे जाणारी आहेत, अशी टीका राहूल गांधी यांनी केली आहे.   

 

https://x.com/RahulGandhi/status/1782375743831572910

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading