Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

शहीद जवानाच्या लेकाचा शुभेच्छा संदेश पाहून अढळराव पाटील गहिवरले

शिरूर : लोकसभा निवडणुकीचा पहिलं टप्पा पार पडला असून आगामी काळात चार टप्प्यात उर्वरीत महाराष्ट्रात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात प्रचार करताना अनेकदा अनपेक्षित थंडावा देणारे क्षण उमेदवारांच्या वाट्याला येतात. शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांना देखील आज असाच अनुभव आला. देशासाठी प्राण गमावलेल्या शहीद जवानाच्या लेकाचा शुभेच्छा संदेश पाहून अढळराव पाटील गहिवरले.

तयाच झालं अस की, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील हे आज लौकी येथे प्रचाराच्या निमित्ताने गेले होते. त्यावेळी भारत मातेच्या सेवेत शहीद झालेले जवान सुधीर पंढरीनाथ थोरात यांच्या छोट्या मुलाने आपल्या हाताने लिहिलेले शुभेच्छा पत्र अढळराव पाटील यांना दिले. त्याच्या सोबत त्याची आई देखील आली होती. या लहानग्या यशच्या हातातील शुभेच्छा पत्राने शिवाजीराव अढळराव पाटील भाऊक झाले. या लहान मुलाचे वडील शहीद झाल्यानंतर अढळराव पाटील यांनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारी होती. ती ते आजही पार पाडत आहेत.

या विषयी बोलताना शिवाजीराव अढळराव पाटील म्हणाले, या छोट्या लेकाचे प्रेम पाहून माझे मन गहिवारून आले आहे. त्याचे वडील देशासाठी शहिद झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत मी या यशची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्याने दिलेला शुभेच्छा संदेश म्हणजे, माझ्या जनतेचे माझ्यावरचे प्रेम आहे. जनतेचे आशीर्वाद मला नेहमी लढण्याची ऊर्जा देत राहतात.

दरम्यान, दादा खरच मोठ्या भावाप्रमाणे माझ्या मागे उभे राहिले, माझ्यावर, माझ्या कुटुंबावर ज्यावेळी कठीण वेळ होती त्या वेळी मला भावासारखा त्यांनी आधार दिला. हे मी कधी विसरू शकत नाही, अशी भावना वीर माता कौसल्या पंढरीनाथ थोरात यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading