Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

भास्कराचार्य अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाटन 

पुणे : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील फिरंगाईमाता हायस्कूल मध्ये भास्कराचार्य ॲस्ट्रॉनॉमी लॅबचे उद्घाटन नुकतेच झाले. हेन्केल  कंपनीच्या सि एस आर फंडातून हे केंद्र  उभारण्यात  आले आहे. हेन्केलचे इनोव्हेशन च्या संचालिका नियाम ओरेल्ली,  डॉ. प्रसाद खंडागळे,  निलेश आडकर, प्लांट मॅनेजर हरप्रीत सिद्धू, गोविंद पवार , जीवन जगदाळे, शिल्पा निगडे, योगेश माने,शेखर डुंबरे  हेकेलं एम्प्लॉईज , प्रिन्सिपल नानासाहेब भापकर, ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमीचे प्रा.विशाल कुंभारे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.   ॲस्ट्रॉनॉमीचे  जागतिक लेवलचे माहिती विद्यार्थ्यांना मिळणार असून हेकेलं इंडिया हे ग्रामीण भागात करते हे पाहून आनंद वाटला असे उद्गार नियाम ओरेल्ली यांनी काढले.
विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी आणि अवकाशासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना अवकाश निरीक्षण करून स्वतः शोधता यावीत, या हेतूने उच्च दर्जाचे लेन्स असणारे टेलिस्कोप , बायनोक्युलर, 3डी निओन पेंटिंग, ॲस्ट्रॉनॉमी डॉक्युमेंटरी, सॉफ्टवेअर, अवकाश निरीक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य आणि अवकाशासंबंधी मार्गदर्शन करणारी अनेक प्रकारची पुस्तके या ॲस्ट्रॉनॉमी लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.ॲस्ट्रॉनॉमी लॅब चे नियोजन, मांडणी व संचलन ग्लोबल मिशन ॲस्ट्रॉनॉमी अँड रिसर्च सेंटर चे संचालक प्रा. विशाल कुंभारे यांनी केले, तसेच पुढील प्रशिक्षणाचे काम यांच्याच मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या ॲस्ट्रॉनॉमी लॅब मधून विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, सूर्यमाला, तेजोमेघ, आकाशगंगा, ग्रहणे अश्या अनेक गोष्टी शिकता येणार आहेत. तसेच येथून विद्यार्थ्यांची खगोलशास्त्रज्ञ बनण्याची पायाभरणी होईल असे डॉ प्रसाद खंडागळे यांनी सांगितले. प्रा. कुंभारे यांनी ॲस्ट्रॉनॉमी लॅबची आलेल्या मान्यवरांना सखोल माहिती दिली. या वेळी इस्रा बंगलोर येथून सॅटेलाईट सोडणारे  तळेगाव दाभाडे येथील हेन्केल ॲस्ट्रॉनॉमी  लॅब  मधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या स्कूल मध्ये सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. पुणे परिसरात ही 11 वी ॲस्ट्रॉनॉमी लॅब असून समाजातील वंचित घटकांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे डॉ प्रसाद खंडागळे यांनी पुढे सांगितले. विशाल कुंभारे यांनी मिशन ॲस्ट्रॉनॉमी पुणे परिसरात करत असलेल्या कामाची माहिती दिली. भापकर सरांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading