Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अखेर उदयनराजे भोसले यांना भाजपने उमेदवारी दिली

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडील साताऱ्याची जागा काढून भाजपकडे घेतली होती. त्यानंतर उमेदवारी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र भाजपने  कोणतीही अधिकृत घोषणा त्यावेळी केली नव्हती. त्यानंतर सलग तीन दिवस उदयनराजे भोसले दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. भाजपने उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून अखेर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दिल्लीतून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच उदयनराजे भोसले यांनी आपलं शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता साताऱ्यात कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.

उदयनराजे भोसले सलग तीन दिवस दिल्लीमध्ये होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झालं होतं, मात्र उमेदवारी मिळणार की नाही याची साशंकता जनतेच्या मनात होती. दुसरीकडे साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी आपलं शक्तिप्रदर्शन सुरू केलं होतं.

दिल्लीतून आल्यानंतरच उदयनराजे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास उघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज लवकरच दाखल करतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading