Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

तटकरे यांना पुन्हा खासदार करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे अदिती तटकरे यांचे आवाहन 

रायगड : राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचे उमेदवार  सुनिल तटकरे साहेबांना प्रचंड मतांनी रायगडचे खासदार म्हणून पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार करावा यासाठी  महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे असे आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
शिवसेना युवासेना महाड तालुकाच्यावतीने ३२- रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार मा. खा. सुनिल तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करताना तटकरे बोलत होतया.
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकूम, महाड तालुका संपर्क प्रमुख इक्बाल चादले, महाड तालुका सहसंपर्क प्रमुख प्रमोद गोगावले,समीर रेवाळे, महाड तालुका महिला संपर्क प्रमुख सुनंदा कदम, युवासेना महाड तालुका संपर्क प्रमुख सचिन राणे, महाड तालुका महिला सहसंपर्क प्रमुख उत्कर्षा पवार, युवासेना महाड तालुका सहसंपर्क प्रमुख राहूल गायकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान,  अदिती तटकरे यांनी तळा तालुक्यातील मौजे मांदाड, कुडे, रोवळे, मजगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना RPI(A) मनसे महायुतीचे लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार मा. खा. सुनिलजी तटकरे यांच्या 32 रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गाव बैठकीस उपस्थित राहून गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading