“..त्यामुळे खासदारही त्याच विचाराचा असला पाहिजे”, सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
बारामती : महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून बारामती मतदारसंघातील अनेक ठिकाणी जाऊन सुनेत्रा पवार गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. यातच त्यांनी मुळशी तालुक्यातील मान येथील जय गणेश कॉलनी येथे भेट दिली असता त्यांनी नागरिकांना महायुतीला मतदान करण्याचे आव्हान केले.
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माहिती शासनाच्या वतीने मुळशी येथे होत असलेल्या आणि होणाऱ्या कामांमुळे येथील जनता विकासासोबत तसेच महायुती सोबत असल्याचे दिसून आले. केंद्र आणि राज्यात एकच विचाराचे सरकार असणारा आहे, त्यामुळे खासदारही त्याच विचारायला विचाराचा असला पाहिजे. अशी भूमिका येथील जनतेने घेतल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी महायुती सर्व घटक पक्षाच्या पदाधिकार्याने एकजुटीने एक मताने महायुद्ध विजयी करण्याचे आव्हानही सुनेत्रा पवार यांनी केले. दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या प्रचाराची जोरदार सुरूवात केली आहे. सुळे देखील आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतांना दिसत आहेत. त्यामुळे बारामतीतच्या लढतीत कोण बाजी मारणार ? याची प्रतिक्षा आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
