Wednesday, November 11, 2026
Latest NewsPUNE

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आझम कॅम्पसची अभिवादन मिरवणूक

 

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ. पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी साडे नऊ वाजता साधू वासवानी चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

संस्थेचे सचिव प्रा .इरफान शेख ,डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एम.डी.लॉरेन्स, शाहिद इनामदार, एस ए इनामदार, शाबिर शेख, रशीद चीनिवार, वाहिद बियाबानी, आसिफ शेख, बबलू सय्यद, युसूफ शेख, अब्दुल वहाब,विश्वस्त, मुख्याध्यापक , प्राचार्य ,पदाधिकारी, कर्मचारी आणि २ हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले.अल्पसंख्य समुदायातील विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय होते.ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी या अभिवादन मिरवणुकीचे स्वागत केले.

दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. हजारो विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेशांचा प्रसार केला जातो.

Leave a Reply