Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

“आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्यदयात भाजप तर हातात धनुष्यबाण”, मल्हार पाटलांचं मोठं विधान

धाराशिव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर मराठवाड्याची मोठी जबाबदारी लोकनायक डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर देण्यात आली होती. आपल्या खंबीर नेतृत्वाने पाटील साहेबांनी मराठवाड्यात राष्ट्रवादी रूजवली, वाढवली म्हणूनच राष्ट्रवादीत डॉ. पद्मसिंह पाटील यांचं नाव कायम आहे. पाटील कुटुंब आणि राष्ट्रवादी हे कधीच वेगळं होऊ शकत नाही. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे अर्चना पाटील खंबीरपणे उभ्या असून त्यांना विजयी करण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावर आहे. असे आवाहन अर्चना पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी केलं आहे.

अर्चना पाटील यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ काल अजितदादांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यावेळी मल्हार पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात भरीव कामगिरी करण्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन संपुर्ण ताकदीने काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

तर २०१९ ला अजित पवार यांच्या सहमतीने डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराने राष्ट्रवादी सोडत भाजप प्रवेश केला होता. अजित पवार यांनी आम्हाला आधी पाठवले व त्यानंतर ते स्वत: भाजपसोबत आल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलाय. तर आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्यदयात भाजप तर हातात धनुष्यबाण असल्याचे मल्हार पाटील म्हणाले होते. त्यानंतर २०१९ पासूनच राष्ट्रवादी फोडायचे षडयंत्र चालू होते का असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. याबाबत अजित पवार यांनी स्वत : द्यावे असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून अर्चना पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संधी दिली आहे. यातच आता दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading