Saturday, September 19, 2026
Latest NewsPUNE

दीदी कृष्णाकुमारीजी जागतिक शांतता यात्रेच्या दौऱ्यावर

पुणे : साधू वासवानी मिशनच्या प्रमुख दीदी कृष्णाकुमारी जी  या जागतिक शांतता यात्रेच्या दौऱ्यावर निघाल्या आहेत. त्यांचा हा दौरा दि. १४ एप्रिल २०२४ रोजी पुण्यातून सुरू होत आहे. सुमारे ७२ दिवसांचा दौरा असेल. यात प्रामुख्याने दि. १४ एप्रिल ते २५ जून या कालावधीत मुंबई, दुबई, मियामी, डल्लास, फोर्ट लॉडरडेल, न्यू जर्सी, बोस्टन, न्यूयॉर्क शहर, स्टॅमफोर्ड, लॉस एंजेलिस, शिकागो आणि लंडन अशा अनेक शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये त्यांचा दौरा असेल.

या दौऱ्यादरम्यान, दीदी कृष्णाकुमारी जी या इंग्रजी आणि सिंधी भाषांतील प्रेरक आणि मार्गदर्शक प्रबोधन, युवा संमेलने, कार्यशाळा, ध्यान, प्रश्नोत्तर सत्रे आणि साधना शिबिरांमध्ये सहभागी होतील. प्रामुख्याने व्यक्तीमत्त्व विकास, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि आध्यात्मिक विकासाला प्रेरणा देणे हे या कार्यक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

दीदी कृष्णाकुमारी जी यांचे मार्गदर्शक, गुरू दादा जेपी वासवानी यांनी दिलेल्या “हृदयातील शांतता हीच जागतिक शांतता निर्माण करेल” या शिकवणीच्या आधारावर ही वाटचाल सुरू आहे.  दीदींच्या दौऱ्याच्या चौकशी आणि अधिक तपशीलांसाठी कृपया www.sadhuvaswani.org ला भेट द्यावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading