Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये महिला इंजिनीयरला झालेल्या गार्टनर्स डक्ट सिस्ट या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार 

पुणे :  सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये २७ वर्षीय इंजिनीयर प्रियांका (नाव बदलण्यात आले आहे) यांना झालेल्या गार्टनर्स डक्ट सिस्ट या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीममधील डॉ मिनी साळुंखे आणि डॉ गौरी जगदाळे यांनी प्रियांका यांच्यावर इन्टॅक्ट सिस्टचे सर्जिकल एक्सिजन (मार्सपियलायजेशन) करून वैद्यकीय उपचारांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.

गार्टनर डक्ट सिस्ट म्हणजे योनिमार्गामध्ये तयार होणारी एक प्रकारची गाठ. वयस्क महिलांपैकी २५% जणींमध्ये गार्टनर नलिका असतात पण फक्त १% महिलांमध्ये त्याचे रूपांतर गाठीमध्ये (गार्टनर्स डक्ट सिस्ट) होते, सामान्यत: याचा आकार २ सेमीपेक्षा लहान असून याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र लक्षणे जरी दिसून येत नसली तरी सिस्टचा आकार वाढू शकतो. आणि जर सिस्ट मोठे असेल तर सर्जरी करावी लागू शकते. पेल्विक तपासणीद्वारे याचे निदान केले जाते. त्यामुळेच प्रियांका यांची केस अपवादात्मक ठरली. डॉ साळुंखे आणि डॉ जगदाळे यांची वैद्यकीय कौशल्ये, समन्वय आणि सह्याद्रि हॉस्पिटल्समधील प्रगत वैद्यकीय सुविधा यामुळे हे उपचार यशस्वी होऊ शकले.

सह्याद्रि हॉस्पिटल्स, हडपसर येथे करण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या जननेंद्रियाच्या बाह्य मांसल भागास एक छोटा कट देण्यात आला. यानंतर मार्सुपियालायझेशन (Marsupialization) या शस्त्रक्रिया तंत्राचा वापर केला गेला. ज्याद्वारे गळूमध्ये स्लीट बनवणे, त्याच्या कडा शिवणे आणि त्यातील द्रवाचा निचरा होऊ शकेल अशा पद्धतीने ती जागा उघडी ठेवणे याचा समावेश होता. अत्यंत नाजुक जागी असलेल्या या गाठीचा आकार ५X५ सेमी म्हणजे सर्वसामान्य केसेसमध्ये आढळणाऱ्या सिस्टपेक्षा बराच मोठा होता. त्यामुळेच ही केस दुर्मिळ व आव्हानात्मक होती. प्रक्रियेनंतर प्रियांका यांच्या तब्येतीत अतिशय वेगाने सुधारणा होत असल्याचे दिसून आले, सर्जरीनंतर अवघ्या सहा तासांत त्या पुन्हा चालू शकल्या.

मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या संचालिका आणि ऑब्स्टट्रिक्स विभागाच्या प्रमुख डॉ मिनी साळुंखे यांनी सांगितले, “गार्टनर्स डक्ट सिस्ट खूपच दुर्मिळ आहे. प्रियांकाच्या केसमध्ये सिस्टचा मोठा आकार आणि ते असलेली जागा यामुळे आमच्यासमोर खूप मोठे आव्हान होते. सर्जिकल एक्सिजन यशस्वी झाले आणि रुग्णाच्या हालचालींवर फारसा परिणाम होऊ न देता सिस्ट पूर्णपणे काढून टाकण्यात आले, त्यांची तब्येत वेगाने सुधारली याचा आम्हाला खूप आनंद आहे.”

अतुलनीय वैद्यकीय देखभाल प्रदान करण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्स वचनबद्ध आहे.  प्रगत प्रक्रिया व उपचारांमध्ये हे रुग्णालय सातत्याने आघाडीवर असून आपल्या रुग्णांच्या कल्याणासाठी समर्पित आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading