Thursday, November 12, 2026
BusinessLatest News

व्हॉट्सॲप डिजिटल व्यवहाराची संधी देऊन, प्रीमियम पेमेंट सुलभ करून बजाज अलियान्झ लाइफ ग्राहकांना वेगळाच अनुभव देते

पुणे : भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक, बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सने Meta सह भागीदारी केली आहे. याद्वारे त्यांनी WhatsApp वर प्रीमियम पेमेंट पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. लाखो भारतीय ग्राहकांना जोडणारे WhatsApp हे संवाद आणि विविध ऑनलाईन सेवांसाठीचे सर्वात लोकप्रिय ॲप आहे. या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी तसेच ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी, बजाज अलियान्झ लाइफने व्हॉट्सॲपद्वारे प्रीमियम पेमेंट सेवा अपग्रेड केल्या आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांची पॉलिसी आणि पेमेंट्स एकाच ठिकाणी मॅनेज करणे सोपे होईल. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, UPI यांसारख्या विविध पेमेंट पद्धतींद्वारे ग्राहक सहजतेने त्यांचे प्रीमियम थेट WhatsApp इंटरफेसमध्ये भरू शकतात.

हा उपक्रम थेट व्हॉट्सॲपमध्ये पेमेंट प्रक्रिया निश्चित करतो. तसेच प्रिमियम भरताना अन्य पेमेंट ऍपमध्ये जाण्याची गरज देखील भासत नाही, कारण ही सुविधा आता थेट व्हॉट्सॲपमध्ये उपलब्ध झाली आहे. यामुळे ग्राहकही खुश असतात. WhatsApp च्या विस्ताराचा फायदा घेऊन, बजाज अलियान्झ लाइफ ॲपवर जवळपास 25+ सेवा ऑफर करते. या प्रीमियम पेमेंटच्या नवीन जोडणीचा उद्देश ग्राहकांचा अनुभव अधिक विस्तृत, व्यापक, सोयीचा बनवण्याचा आहे. WhatsApp Pay च्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे, सर्व व्यवहार संरक्षित केले जातात. केवळ व्यवहार करणाऱ्यांनाच याची माहिती असते. यामुळेच हा एक अत्यंत सुरक्षित पेमेंट पर्याय ठरतो. वापरायला सोपे आणि विश्वास यावर भर असल्याने ग्राहकही खुश असतात. यामुळेच बजाज अलियान्झ लाइफ हे विमा उद्योगातील ग्राहक-केंद्रित नवकल्पनेत आघाडीच्या स्थानी आहे.

बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य ऑपरेशन्स आणि ग्राहक अनुभव अधिकारी राजेश कृष्णन म्हणाले, “बजाज अलियान्झ लाइफमध्ये आम्ही ग्राहक प्रथम या तत्त्वावर चालतो. आणि त्याच ग्राहकांना आनंदी करण्यासाठी आमच्या असंख्य उपक्रमांच्या मिश्रणात आता WhatsApp देखील सहभागी झाले आहे. आमच्या 25 पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेण्यासाठी आमचा अत्याधुनिक WhatsApp चॅटबॉट वापरणारा ग्राहक आधार, ही आमची संपत्ती आहे. नव्याने ओळख करून दिलेल्या नवीन प्रीमियम पेमेंट पर्यायासह ग्राहकांना आता अधिक समृद्ध आणि समाधानकारक अनुभव मिळेल.

ग्राहक अधिकाधिक डिजिटल होत आहेत आणि त्यांच्या प्रत्येक गरजेच्या पूर्ततेसाठी ते काही न काही शोधतच असतात. याला जीवन विमा देखील अपवाद नाही. आमच्या ग्राहकांच्या सतत वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी बजाज अलियान्झ लाइफ नेहमीच काही न काही नवीन शोधत असते.”

Leave a Reply