महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुस्तके आणि शालेय साहित्य अर्पण करूया – परशुराम वाडेकर
पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानवाला हार, फुले अर्पण करण्याबरोबरच गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य व पुस्तके डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण करून ते साहित्य गरजु विद्यार्थ्यांना देऊन अभिवादन करुया..! असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे नेते व डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी केले आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त यंदाच्या वर्षी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी एक वेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहोत. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन लाखो आंबेडकरी अनुयायी हार, फुले वाहुन मेनबत्ती प्रज्वलित करुन अभिवादन करत असतात यात कुठेही दैवतीकरणाचा भाव नसला तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात हार, फुले वाहिले जात असतात त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी हे हार, फुले उपयोगाचे न राहता कचरा म्हणुन वाया जात असते ही आर्थिक व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे.
तसेच त्यातुन दैवतीकरण आणि व्यक्ती पुजाकडे जाणारी परंपरा तयार होण्याची शक्यता होत आहे .स्वतः बाबासाहेबांना व्यक्ती पुजा अमान्य होती भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यावर शिक्षण हेच प्रभावी औषध असेल असे स्वतः बाबासाहेब म्हणाले होते की, आपणांस अवाहन करित आहोत की हार, फुले मेणबत्ती प्रज्वलित करण्याबरोबरच बाबासाहेबांच्या चरणी शैक्षणिक साहित्य अर्पण करुन अभिवादन करावे जमा होणाऱ्या शालेय साहित्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने तेवढ्याच किमतीचे शैक्षणिक साहित्य त्यामध्ये वाढवुन आपल्या शहरातील होतकरु गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य पोहचवुन बाबासाहेबांना अभिवादन करूया असे आमचे म्हणणे आहे.
या अभियानाच्च्या उद्घाटन कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे, आपल्या उपस्थितीमध्ये हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही करू पाहत आहोत आपणही सहभागी व्हावे ही विनंती. कळावे, परशुराम वाडेकर
