Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या  हस्ते शॉपर्स स्टॉपच्या पुण्यातील 6 व्या दालनाचे उदघाटन

पुणे : भारतातील सर्वोच्च दर्जाचे फॅशन, सौंदर्य आणि भेटवस्तूशी निगडीत ओमनीचेन डेस्टीनेशन, शॉपर्स स्टॉप, पुण्यात फॅशनप्रेमींसाठी घेऊन आले आहे; आनंदित होण्याचे आणखी एक कारण! या ब्रॅंडच्या वतीने एका चैतन्यमय शहरात आपले नवीन दुकान सुरू केले आहे. लोकप्रिय अभिनेत्री स्टाइलबाज सई ताम्हणकर हिच्या शुभहस्ते या दालनाचे  उदघाटन करण्यात आले. पुण्यातील ट्रिबेका हायस्ट्रीट येथे असलेल्या या दालनात आपल्या ग्राहकांना खरेदीचा सर्वोत्तम अनुभव आणि प्रीमियम राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ब्रँडचे भरपूर पर्याय उपलब्ध असतील. ज्यामुळे शहरातील चोखंदळ खरेदीदारांसाठी हे अल्टीमेट गो-टू डेस्टीनेशन बनेल.

पुण्यातील या 6 व्या शॉपर्स स्टॉपच्या समावेशामुळे, एक आनंददायी खरेदीचा अनुभव खरेदीदारांच्या नजीक उपलब्ध झाला आहे. जवळपास 500 हून अधिक ब्रँड, नवीन फॅशन ट्रेंड, वर्धित सौंदर्य अनुभव, विविध प्रकारच्या घड्याळे, बॅग, सनग्लासेस, सुगंध, भेटवस्तू पर्याय आणि बरेच काही, सर्व सोयीस्करपणे एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने सर्व प्रसंगी सर्वात ट्रेंडी लुक तयार होऊ शकतो.

शॉपर्स स्टॉप लिमिटेड’चे कस्टमर केअर असोसिएट, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आणि सीईओ कवींद्र मिश्रा म्हणाले, “आम्ही आमच्या रिटेल फूटप्रिंटचा विस्तार करत असताना, प्रीमियम उत्पादने आणि सेवांद्वारे ग्राहकांचा अनुभव उंचावण्यासाठी समर्पित आहोत. आमच्या ग्राहकांसाठी खरेदीचा अतुलनीय अनुभव निर्माण करण्याच्या वचनबद्धतेमुळे प्रेरित आहोत आणि पुण्यातील ग्राहकांच्या फॅशनच्या गरजा पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नवीनतम ट्रेंडचा शोध घेणे किंवा पर्सनल स्टाईलिंग वृद्धिंगत करणे असो, आम्हाला विश्वास वाटतो की आमच्या दालनाला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक लक्षवेधी अनुभव ठरेल”.

लॉन्चिंगच्या वेळी बोलताना सई ताम्हणकर म्हणाली, “शॉपर्स स्टॉप हा नेहमीच माझा आवडता ब्रँड राहिला आहे. मी स्वत: या ब्रँडच्या सोबतीने वाढलेली आहे आणि आज पुण्यात शॉपर्स स्टॉपच्या नवीन स्टोअरच्या उदघाटनाचा एक भाग असल्याने मला प्रचंड आनंद आणि उत्साह वाटतो आहे. हे नाव केवळ फॅशनबद्दल नाही, तर प्रत्येकाकरिता स्वागतार्ह, प्रेरणा देणारे आणि फॅशनच्या स्वरुपात स्वतःची अभिव्यक्ती शोधण्याची संधी देणारे आहे. या दालनात आश्चर्यकारक ब्रँड आणि शहरातील अशी 6 दालने असल्याने, पुण्यातील फॅशन उत्साही आणि ट्रेंडसेटरकरिता एक पसंतीचे खरेदी ठिकाण बनले आहे”.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading