Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने दीपक मेहरोत्रा यांची नवीन मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली

पुणे: चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये अग्रणी, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने  (एईएसएल), दीपक मेहरोत्रा यांची मॅनेजिंग डायरेक्टर (एमडी) आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. शैक्षणिक सेवांच्या स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये, नवनवीन शोध आणि विस्तार करत असतांना, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी हा निर्णय खूप महत्वाचा आहे.

दीपक मेहरोत्रा हे एफएमसीजी, टेलिकॉम आणि एजुकेशन इंडस्ट्री मध्ये कुशल आहेत. एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून 35 वर्षांहून अधिक अनुभवासह, त्यांच्याकडे एईएसएलच्या दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील उभरत्या संधींचा फायदा घेण्यासाठी भरपूर ज्ञान आणि कौशल्य आहे. एईएसएलमध्ये रुजू होण्यापूर्वी ते आशीर्वाद पाईप्समध्ये मॅनेजिंग डायरेक्टर होते. त्यांनी पीअरसन इंडिया, भारती एअरटेल, कोका-कोला आणि एशियन पेंट्समध्ये देखील काम केले आहे.

दीपक यांनी आयआयटी रुरकी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री, जेबीआयएमएस मधून एमएमएस आणि द व्हार्टन स्कूल, फिलाडेल्फिया (यूएसए) मधून एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम पूर्ण केला आहे.

दीपक मेहरोत्रा यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल बोलताना एईएसएलला विकासाच्या पुढील टप्प्यात नेण्यासाठी उत्साह व्यक्त केला. देशभरातील विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव वाढविण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान आणि आधुनिक शिक्षण पद्धतींचा लाभ घेण्याच्या महत्त्वावर भर दिला. मेहरोत्रा म्हणाले, “शिक्षण क्षेत्रात अग्रणी असलेल्या एईएसएल मध्ये सामील होण्याचा मला अभिमान वाटतो आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यास सक्षम बनवण्यासाठी टॅलेंटेड टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

दीपक मेहरोत्रा यांची नियुक्ती, ही एईएसएलच्या शैक्षणिक ऑफर वाढवण्यासाठी, त्यांची पोहोच वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचा एक भाग आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करून कंपनी शिक्षण, विकास आणि नावीन्यपूर्ण संस्कृती वाढवण्यासाठी समर्पित आहे.

बायजू रवींद्रन, फाउंडर आणि चेअरमन, बायजूस यांनी दीपक यांचे हार्दिक स्वागत करताना सांगितले, “आम्ही विकासाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत असताना, एईएसएलचे नेतृत्व करण्यासाठी दीपक यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आमची विकास योजना पूर्ण करण्यासाठी आणि कंपनी सध्या अनुभवत असलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर काम करण्यासाठी सीईओ म्हणून त्यांची भूमिका महत्वाची असेल. पियरसन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांचे व्यावसायिक कौशल्य आणि उत्कृष्ट रेकॉर्ड, आकाश बायजूला विकास आणि त्याच्या परिणामाच्या पुढील टप्प्यावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.”

शैलेश हरिभक्ती, चेअरमन, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड, यांनी या महत्त्वाच्या प्रसंगी कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी दीपक यांना बोर्ड मध्ये सामील केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “एईएसएलचे नवे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून दीपक यांची नियुक्ती आमच्या संस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे धोरणात्मक दृष्टीकोन आणि सिद्ध ऑपरेशनल कौशल्य हे उद्योग प्रमुख म्हणून आमचे स्थान मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.” असे ते म्हणाले.

दीपक मेहरोत्रा यांच्या नेतृत्वाखाली एईएसएलने हा नवीन अध्याय सुरू केल्यामुळे, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि गुंतवणूकदारांसह भागधारक, भारतातील सर्वात विश्वसनीय शिक्षण प्रदात्यांपैकी एकाकडून सतत उत्कृष्टता, नवकल्पना आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेची अपेक्षा करू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading