दुसरी ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट स्पर्धा : एलसीपी रहाटणी, न्युट्रीलिशियस्, जेडब्ल्युडी मॅजिशियन्स् संघांची विजयी कामगिरी
पुणे : स्पोटर्सफिल्ड मॅनेजमेंट आणि पुणे लायन्स् तर्फे आयोजित लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ दुसर्या ‘लायन्स् प्रौढ करंडक’ (४० वर्षावरील गट) टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलसीपी रहाटणी, न्युट्रीलिशियस् आणि जेडब्ल्युडी मॅजिशियन्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.
वारजे येथील स्केलअप क्रिकेट अॅकॅडमी येथील मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत कर्णधार फैयाझ लांडगे याच्या ६० धावांच्या जोरावर एलसीपी रहाटणी संघाने पासलकर रॉयल्स् संघाचा ६१ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रहाटणी संघाने १४० धावांचे लक्ष्य उभे केले. या आव्हानासमोर पासलकर रॉयल्स्चा डाव ७९ धावांवर गडगडला.
सुशिल मेनन याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर जेडब्ल्युडी मॅजिशियन्स् संघाने फिनिक्स् क्रिकेट क्लबचा ४२ धावांनी सहज पराभव केला. दुसर्या सामन्यात विजय निंबाळकर याच्या कामगिरीमुळे न्युट्रीलिशियस् संघाने एसएसपीए क्रिकेट क्लबचा ६९ धावांनी पराभव करून आगेकूच केली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एलसीपी रहाटणीः १६.३ षटकात ९ गडी बाद १४० धावा (फैयाझ लांडगे ६० (३६, ९ चौकार, २ षटकार), मोहन बदुरे १३, सचिन कापडे ३-७, पराग चितळे ३-३१) वि.वि. पासलकर रॉयल्स्ः १७ षटकात १० गडी बाद ७९ धावा (विक्रम कांबळे ३५, महेंद्र जगताप ११, विजय नवले ३-१३); सामनावीरः फैयाझ लांडगे

जेडब्ल्युडी मॅजिशियन्स्ः २० षटकात ७ गडी बाद १७९ धावा (चेतन खोपडे ५५ (३५, ३ चौकार, ४ षटकार), नौशाद खान ३६, सोमनाथ काटके ३८, आतिश पडवळ ३-३०) वि.वि. फिनिक्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद १३७ धावा (जितेंद्र शेंडे ४०, विनोद डी. ३२, सुशिल मेनन ३-१३, चिंतामणी अॅड्रयुसन २-३४); सामनावीरः सुशिल मेनन.

न्युट्रीलिशियस्ः २० षटकात ८ गडी बाद १९० धावा (देवदत्त देवोकर ४६, समाधान दांडेकर ३८, सचिन थोपटे २७, शैलेश बुरसे ४-२९, योगेश माने २-२६) वि.वि. एसएसपीए क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १२१ धावा (योगेश येलारपुरकर २५, प्रमोद पालिवाल २९, प्रशांत तुपे नाबाद २२, विजय निंबाळकर २-२५); सामनावीरः विजय निंबाळकर;

