Sunday, June 7, 2026
ENTERTAINMENTLatest News

नटसम्राट येणार, हाऊसफुल्लचा बोर्ड लागणार प्रयोग पाहायला यावंच लागणार!

मराठी नाट्यसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी नाट्य गौरव २०२४ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. या सोहोळ्याचे खास आकर्षण ठरलं ते कलाकारांसमवेत नांदीने झालेली सुरुवात. तसेच या सोहोळ्यात ‘अतुल परचुरे’ खूप काळानंतर ‘व्यक्ती आणि वल्ली’ च्या रूपात रंगभूमीवर येणार आहेत आणि त्यांच्या सॊबत असणार आहेत ‘महेश मांजरेकर’, ‘आनंद इंगळे’ आणि ‘सुनील बर्वे’. तसेच ‘सिद्धार्थ जाधव’ ‘शाहरुख मांजरसुभेकर’ मधील प्रवेश साकारून ‘महेश मांजरेकरांना’ मानवंदना देणार आहे.

तसेच प्रेक्षकांना ‘जर तर ची गोष्ट’,’करून गेलो गाव’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या गाजत असलेल्या हाऊसफुल्ल नाटकांमधील नाट्यप्रवेश पाहता येणार आहेत, तसेच अनेक गोड सरप्राइझेस या नाट्यगौरव च्या निमित्ताने रसिकांना मिळणार आहेत.

तेव्हा नटसम्राट येणार, हाऊसफुल्लचा बोर्ड लागणार प्रयोग पाहायला यावंच लागणार, झी नाट्यगौरव पुरस्कार २०२४  रविवार ७ एप्रिल संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading