Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे जागतिक रंगभूमीदिन साजरा

पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे जागतिक रंगभूमी दिन नाट्यवाचन, नाट्यछटा आणि नाटिकेचे सादरीकरण करून साजरा करण्यात अला.
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या अभिवाचन कट्ट्यातर्फे बुधवारी पटवर्धन बाग येथील धन्वंतरी हॉल येथे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस संध्या कुलकर्णी लिखित आणि दिग्दर्शित ‌‘पाऊस’ या नाट्यकृतीचे अभिवाचन राधिका थत्ते, अक्षरा जोशी, श्रीशैल शेलार, केतकी जोशी, संध्या कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर विजय तेंडुलकर लिखित ‌‘बळी’ या नाटकाचे अभिवाचन निगडीतील शब्द रंग कला साहित्य कट्ट्याचे कलाकार अशोक अडावदकर, ज्योती कानेटकर, सुभाष भंडारे यांनी केले. याच कलाकारांनी ‌‘मिष्किली’ नाटिकाही सादर केली.
पु. ल. देशपांडे लिखित ‌‘सुंदर मी होणार’ या नाटकातील प्रवेश संध्या कुलकर्णी यांनी सादर केला. ज्योती कानेटकर यांनी स्वलिखित नाट्यछटा सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात प्रज्ञा गुरव यांनी गायलेल्या नांदीने झाली. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, लेखक-दिग्दर्शक अमोल जाधव उपस्थित होते. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या विश्वस्त दीपाली निरगुडकर, प्रसाद कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, अंजली दफ्तरदार, संध्या कुलकर्णी यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन अनुराधा कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading