राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा अपघात
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil ) यांचा अपघात झाला आहे. काल घरातच पाय घसरुन पडल्याने त्यांना दुखापत झाली आहे. यांच्या खुब्याला मार लागला असून हाथ फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. वळसे पाटलांनी स्वतः एक्स हॅंडलवर पोस्ट करीत ही माहिती दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वळसे पाटलांवर आपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलीप वळसे पाटील सहभागी होणार की नाही? याबाबत शंका आहे.
https://x.com/Dwalsepatil/status/1773285542601330758?s=20
