Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून पहिली उमेदवार यादी जाहिर
मुंबई : शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) (Shivsena) लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024)साठी आपली पहिली उमेदवार यादी आज अखेर जाहीर केली. या यादीत 8 मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि नाशिकच्या जागेचा यामध्ये समावेश नाही.
शिवसेनेने (Shivsena) जाहीर केलेली उमेदवार यादी –
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
मावळ – श्रीरंग आप्पा बारणे
