Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबईतील माहिम समुद्रात 5 मुले बुडाली; एका तरुणाचा शोध सुरू

मुंबई : धुळवडी सणाला मुंबईत गालबोट लागले आहे. माहिम येथील समुद्रकिनारी फियारला आलेली 5 मुलं बुडाली असून यातकील 4 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर एकाच शोध अग्निशमन दलाकडून अद्यापही सुरू आहे. यश कागडा असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात रंगांची उधळण करीत रंगपंचमी उत्सव साजरा केला. मात्र दुपारी चारनंतर काही मुले माहिम-शिवाजी पार्क चौपाटी येथे समुद्रात पोहायला उतरली होती. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक एक करून पाच मुले समुद्रात बुडाली. यावेळी मुलांचा आरडाओरडा ऐकून काहीजण त्यांच्या मदतीला धावून आले. यावेळी पाच पैकी चार मुलांना वाचविण्यात यश आले. त्यापैकी दोघांची प्रकृती स्थिर असून उर्वरित हर्ष (19) आणि ओम (17) तत्काळ उपचारासाठी नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी ओमची प्रकृती स्थिर असून हर्षची प्रकृती चिंताजनक होती. मात्र आता त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर पाचव्या मुलाचा समुद्रात शोध सुरू असल्याचे मुंबई महापालिका आपत्कालीन यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी माहीम पोलीस, अग्निशामक दलाचे पथक, सागरी पोलीस आणि स्वयंसेवक बेपत्ता मुलाचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading