Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महायुतीचा नाशिक तिढा सुटेना ; भाजपच्या नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट

मुंबई  : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीहून महायुतीत तिढा सुटतान दिसत नाही.  शिवसेनेपाठोपाठ भाजपाने मुंबईत शक्तिप्रदर्शन करुन आपली ताकद दाखवली आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे शेकडो समर्थकांसह ठाण्यात रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यांनी एकनाथ शिंदे निवासस्थानी जाऊन यांची भेट घेतली. तर दुसरीकडे 3 आमदारांसह इच्छुकांनी सोमवारी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.  

या बैठकीत नाशिकच्या जागेसंदर्भात स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांनी नाशिकची जागा भापलाच मिळावी, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सांगर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तासभर चर्चा केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी आता काय झालं याबद्दल माध्यमांना सांगितलं.  त्या म्हणाल्या की, आजचा विचार केला तर आमचे तीन आमदार, 100 नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिकची जागा भाजपला मिळावी यासाठी त्यांनी आग्रही आहेत. आमच्या सर्वांची ही मनापासूनची इच्छा की नाशिकची जागा भाजपला मिळावी, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

मनसे महायुतीत सहभागी होण्याची चर्चा असल्याने नाशिक आणि शिर्डीची जागा त्यांच्याकडे जाणार अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्ये आणि इच्छुकांमध्ये नाशिकच्या जागेवरुन धुसफुस सुरु आहे.  दुसरीकडे छगन भुजबळ यांनीदेखील नाशिकच्या जागेवर हक्क सांगितला आहे. यावर देवयानी फरांदे  म्हणाल्यात की, ही जागा सगळेच मागतील, पण ज्यांची जास्त ताकत त्यांना ही जागा मिळावी.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading