Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

एयर इंडियातर्फे निवडक आशियाई मार्गांवरील विमान वाहतुकीसाठी खास बिझनेस क्लासचे शुल्क

गुरुग्राम – एयर इंडियाने आज दक्षिण आशियादक्षिणपूर्व आशिया आणि मध्यपूर्व देशांसाठीच्या विमानवाहतुकीवर खास सेल आयोजित केला असून त्यात खास शुल्काचा लाभ घेता येईल.  मर्यादित काळासाठीची ही प्रमोशन ऑफर चुकवण्यासारखी नसून त्यामध्ये बिझनेस क्लासचे शुल्क एरवीच्या बेस शुल्कापेक्षा ३५ टक्क्यांनी कमी असेल.

हे खास शुल्क सिंगापूर, बँकॉक, फुकेत, ढाका, कोलंबो, दुबई, अबू धाबी, दोहा, जेदाह, बहारिन, मस्कत आणि कुवैत या देशांत जाण्यासाठी व तिथून येण्यासाठीच्या प्रवासावर लागू होणार आहे. या सेलदरम्यानचे बुकिंग दोन आठवड्यांसाठी सुरू राहाणार असून ते २ एप्रिल २०२४ रोजी खुले होईल व त्यावर ३० सप्टेंबपर्यंत प्रवास करता येणार आहे.

या विक्रीदरम्यानची सीट इन्व्हेंटरी मर्यादित आणि फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह तत्वार उपलब्ध असेल.

कर आणि सरचार्ज वगळता सँपलसवलतीतील बेस शुल्क (केवळ अंशतः लिस्टिंग)
मार्ग एका मार्गावरील बेस शुल्क दोन्ही मार्गांवरील बेस शुल्क
दिल्ली- दुबई रू. 35245 रू.52067
दुबई- दिल्ली एईडी 1828 एईडी 3209
दिल्ली- दोहा रू.29374 रू. 57951
दोहा- दिल्ली क्यूएआर 1463 क्यूएआर 2308
दिल्ली- बँकॉक रू. 25320 रू.41027
बँकॉक- दिल्ली टीएचबी 12526 टीएचबी 24304
दिल्ली- सिंगापूर रू. 31042 रू. 53954
सिंगापूर- दिल्ली एसजीडी 1009 एसजीडी 1577

आयएनआर = भारतीय रुपयेएसजीडी सिंगापूर डॉलरटीएचबी = थाई बाथक्यूएआर कतारी रियाल; हे शुल्क वेगवेगळ्या शहरांत तिथे लागू होणारे कर आणि विनिमय दरामुळे किंचित वेगळे असू शकतात.

हा सेल सर्व विक्री चॅनेल्सवर उपलब्ध असून त्यात एयर इंडियाचे संकेतस्थळ (www.airindia.com), मोबाइल अप, विमानतळ तिकिटिंग कार्यालये, शहरी बुकिंग कार्यालये यांचा समावेश होतो. सेलदरम्यानचे शुल्क ट्रॅव्हल एजंट्सकडे (ओटीएज) आणि इतर अधिकृत ट्रॅव्हल पार्टनर्सकडे यांच्याकडेही उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading