सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रिकेट संघ कुलगुरू चषकाचा विजेता
पुणे : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-20 क्रिकेट-2024 या स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कर्मचारी संघाने विजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेत विद्यापीठाच्या कर्मचारी संघाने कौतुकास्पद कामगिरी करून विजेतेपद मिळविल्याबदल कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विजय खरे यांनी संपूर्ण स्पर्धेत कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे हे यश कर्मचारी क्रिकेट संघास प्राप्त करता आले अशी भावना यावेळी सर्व कर्मचारी खेळाडू यांनी व्यक्त केली
या स्पर्धेचा अंतिम फायनल सामना *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरुद्ध वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी असा झाला होता. यात *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी क्रिकेट संघाने परभणी संघास 37 धावाने पराभूत करून विजेतेपद पटकावले. नाणेफेक जिंकून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने प्रथमतः फलंदाजी करत 147 धावांचे लक्ष्य दिले होते. परभणी विद्यापीठाच्या संघास 147 लक्षाचा पाठलाग करताना 109/6 धावांपर्यंतच मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक :
पुणे विद्यापीठ : 20 षटकात 6 बाद 146 धावा :-
(मनिष गायकवाड – 50, बसवंत गजलवार- 39, नितीन प्रसाद – 25).
परभणी विद्यापीठ – मनोज 2/21, माणिक, जमीर व हनुमान – प्रत्येकी 01 विकेट् ).
परभणी विद्यापीठ -20 षटकात 6 बाद 106 धावा.
(धीरज पाथरीकर -44 , माणिक ढगे -22, संतोष यादव – 15 धावा)
*पुणे विद्यापीठ * – सचिन सुर्वे- 3/19 , संतोष सुगावे 2/19 मनीष गायकवाड 1/22 )
सामनावीर – मनीष गायकवाड
