ड्युरोप्लाय आणत आहे ‘बियॉण्ड ब्ल्यूप्रिंट्स’ ही पॉडकास्ट मालिका; आघाडीचे इंटिरिअर डिझायनर्स व आर्किटेक्ट्स यांच्या रचना तत्त्वांचा शोध घेणारी मालिका
ड्युरोप्लाय या भारतातील अव्वल आणि सर्वांत अनुभवी प्लायवूड कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने आपल्या ‘बियॉण्ड ब्लूप्रिंट्स’ या नवीन उपक्रमाचे अनावरण केले आहे. ही एक पॉडकास्ट मालिका असून, इंटिरिअर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्स यांत आपल्या उत्क्रांतीची प्रक्रिया उलगडून सांगणार आहेत तसेच त्यांचे डिझाइन तत्त्वज्ञान विकसित करणाऱ्या घटकांबद्दलही बोलणार आहेत. ड्युरोप्लायचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अखिलेश चितलांगिया या अनोख्या पॉडकास्ट मालिकेचे सूत्रसंचालन करणार आहेत. ही मालिका सध्या निर्माण होत असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गरजेची पूर्तता करत आहे. अनेक भारतीय आता त्यांच्या घरांची अंतर्गत रचना करण्यासाठी प्रोफेशनल इंटिरिअर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्सची मदत घेऊ लागल्यामुळे ही गरज निर्माण झाली आहे.
आर्किटेक्टस् आणि इंटिरिअर डिझायनर यांच्या मुलाखतींचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरील ड्युरो टीव्ही चॅनलवर उपलब्ध आहेत, तर पॉडकास्टचे सर्व भाग स्पॉटीफायवर बियॉन्ड ब्लूप्रिंट्स शोधताना मिळू शकतात.
ड्युरोप्लायचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. अखिलेश चितलांगिया म्हणाले, “आपल्या व्यक्तिगत शैलीचे व आवडीनिवडींचे प्रतिबिंब दाखवणारे एक सुरचित घर प्रत्येकाला मिळाले पाहिजे असे आम्हाला वाटते. ‘बियॉण्ड ब्लूप्रिंट’च्या माध्यमातून, इंटिरिअर डिझाइन व आर्किटेक्चरचे विश्व सर्वांपुढे येईल, सर्वांना ते समजून घेता येईल आणि या सेवा उपलब्ध करून घेण्यास मदत होईल, अशी आशा आम्हाला वाटते.”
ते पुढे म्हणाले, “व्यक्तींना त्यांची घरे सौंदर्यपूर्ण आणि कार्यात्मक करण्यासाठी आवश्यक ज्ञान व प्रेरणा देऊन सक्षम करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांशी संभाषणांच्या माध्यमातून, आपले विचार घराच्या अंतर्गत रचनेत आकारात घेताना बघण्याची क्षमता, प्रत्येक भारतीयाला मिळावी हे ‘बियॉण्ड ब्लूप्रिंट’चे लक्ष्य आहे. इंटिरिअर डिझाइनच्या जगात रस असलेल्या प्रत्येकासाठी हा पॉडकास्ट एक मोलाचे संसाधन ठरेल.”
अशा पॉडकास्ट मालिकेच्या आवश्यकतेबद्दल श्री. चितलांगिया म्हणाले, “संपन्नता तसेच अधिक मोठ्या घरांकडील कल वाढत असल्यामुळे अनेक भारतीयाला आता थोडा अधिक खर्च करून आर्किटेक्ट व इंटिरिअल डिझायनरची मदत घेण्याची इच्छा आहे. एक नवोन्मेषावर आधारित ग्राहककेंद्री कंपनी म्हणून, आम्हाला मोठ्या प्रमाणावरील लोकांची गरज वाटणाऱ्या सेवा आम्ही पुरवत आलो आहोत. घराच्या रचनेला आकार देणाऱ्या सर्जनशील मनांमध्ये डोकावून एक दृष्टी प्राप्त करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटले. त्यातूनच ‘बियॉण्ड ब्लूप्रिंट्स’ ही संकल्पना पुढे आली.”
आर्किटेक्ट्स आणि इंटिरिअर डिझायनर्सच्या विश्वांमध्ये डोकावून, घरांच्या अप्रतिम रचना करणाऱ्या त्यांच्या विचार प्रक्रियांची व कल्पनांची खोलवर माहिती मिळवण्याची अनन्यसाधारण संधी ‘बियॉण्ड ब्लूप्रिंट्स’ घराच्या मालकांना देऊ करते.
इंटिरिअर डिझायनर किंवा आर्किटेक्ट हीदेखील माणसेच आहेत आणि तीही आयुष्यातील ताणांमधून, चढउतारांतून जातात. हा प्रवासच नवोन्मेष्कारी कल्पनांना व उपायांना जन्म देतो. त्यातूनच सौंदर्यपूर्णता व कार्यात्मकता, सौंदर्य व परवडण्याजोगा खर्च, भव्यतेचा आभास व कार्यक्षम जागा व्यवस्थापन यांचा मेळही साधला जातो.
घरांचे मालक, डिझायनिंगची आवड असलेले तसेच इंटिरिअर व आर्किटेक्चरच्या जगात रस असलेले लोक यांना ड्युरोप्लाय विशेष आमंत्रण देत आहे. या पॉडकास्ट मालिकेच्या माध्यमातून ते सगळे घराच्या रचनेच्या असंख्य संभाव्यतांचा शोध घेऊ शकतील.
आर्किटेक्टस् आणि इंटिरिअर डिझायनर यांच्या मुलाखतींचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरील ड्युरो टीव्ही चॅनलवर उपलब्ध आहेत, तर पॉडकास्टचे सर्व भाग स्पॉटीफायवर बियॉन्ड ब्लूप्रिंट्स शोधताना मिळू शकतात.
