Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील ASMA महाविद्यालय फक्त कागदावरच

 

पुणे : शास्त्री एज्युकेशन फाउंडेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या ASMA Institute of Management या महाविद्यालयाची शुल्क नियमन समितीने निर्धारित केलेले शुल्क ६५ हजार असून हे महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून दोन वर्षाचे ४,५०,००० लाख रुपये एवढे शुल्क आकारत आहे. अतिरिक्त शुल्क आकारून सुद्धा प्रत्यक्षात या महाविद्यालयामध्ये सदर अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जात नाही. महाविद्यालयाने या अभ्यासक्रमासाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली आहे. या अभ्यासक्रमाचे लेक्चर्स हे हिंजवडी येथे होतात. इंटर्नशीप आणि नोकरीचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे
MBA Agri Business Management हा कोर्स २ वर्षांचा असून सदर महाविद्यालय हा अभ्यासक्रम एका वर्षात पूर्ण करून दुसऱ्या वर्षी Paid Internship देण्याचा दावा करून विद्यार्थ्यांची फसवणूक करीत आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सोडून जाऊ नये आणि सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क एकत्रित महाविद्यालयाला मिळावे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला बळजबरीने महाविद्यालय सांगेल त्याच बँकेतून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी भाग पाडण्यात येते. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. विद्यार्थ्यांना संस्थेने अनधिकृत पद्धतीने बाँड पेपर वर करार करायला भाग पाडले असून प्रत्येक विद्यार्थ्याने संस्थेत दोन ऍडमिशन करून देणे बंधनकारक असेल व इंटर्नशीप मिळविण्याकरिता या कराराचे पालन बंधनकारक असेल अशी सक्त ताकीद महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दिली आहे. जे विद्यार्थी या कराराचे उल्लंघन करतील किंवा करार करण्यास नकार देतील त्यांना विषयांमध्ये नापास करण्याची धमकी देखील महाविद्यालयाने दिली आहे. महाविद्यालयाने ८०% विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेमध्ये जाणीवपूर्वक पद्धतीने नापास केले आहे.सदर विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनाची मागणी केली असता विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहे.

महाविद्यालयाने निर्धारित केलेल्या PIBS या त्रयस्थ संस्थेमध्ये विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

सदर महाविद्यालयाने निर्धारित केलेली त्रयस्थ संस्था म्हणजेच PIBS (Pune Institute Of Buisness Studies) या संस्थेतील प्रा. अरिंदंम घोष या प्राध्यापकाने विद्यार्थिनींसोबत लैंगिक छळ केल्याची घटना यादरम्यान समोर आली. सदर प्राध्यापक विद्यार्थिनींशी भर वर्गात अर्वाच्य भाषेत बोलून त्यांना लाजिरवाणे करत होते.
त्याचबरोबर त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तीव्र आंदोलन केल्यानंतर हिंजवडी पोलिस स्थानकात गुन्हा देखील दाखल झाला आहे.
या प्रकारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने UGC, DTE, AICTE आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू करून पराग काळकर ह्यांना या कॉलेजच्या अनागोंदी कारभाराची तक्रार दिली आहे. सदर महाविद्यालयाची सलग्नता विद्यापीठाने तात्काळ रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे त्याचबरोबर असे जितके महाविद्यालय बोगस असून त्यांची नावे फक्त कागदावरच आहेत अशा सर्व महाविद्यालयांवर कारवाई करावी अशी मागणी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.

अभाविपची पोलिस आयुक्तांना तक्रार
या प्रकरणात दोषी असलेल्या ASMA इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट आणि पुणे इन्स्टिट्युट ऑफ बिजनेस सायन्स (PIBS) या संस्थेचे संचालक असलेले प्रा. गणेश तन्नू आणि प्रा. अरिंदम घोष यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व या विषयात पाठपुरावा करावा अशी मागणी अभाविप ने पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading