Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा धाराशिव जिल्ह्यातील आरोग्यसेवा सुधारणेसाठी पुढाकार


पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारणेच्या कार्यात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून (DBT) विद्यापीठाला भरीव अनुदान मिळाले आहे. माननीय कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य सेवा आव्हानांचा सामना करण्यासाठी उल्लेखनीय ठरला आहे.
माननीय कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभाग, हेल्थ सायन्सेस विभाग, इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉरमॅटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजी आणि विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील प्राध्यापकांनी जिल्हा नागरी रुग्णालय आणि महिला रुग्णालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प बायोटेक्नॉलॉजी विभागाकडे प्रस्तावित केला होता. त्यासाठी नुकतेच ३.८ कोटी रुपये अनुदानाचे प्रशासकीय आदेश प्राप्त झाले आहेत.
हा प्रकल्प बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या “युनिक मेथड्स ऑफ मॅनेजमेंट अँड ट्रीटमेंट ऑफ इनहेरिटेड डिसऑर्डर्स (UMMID)” योजनेअंतर्गत समाविष्ट आहे. हा प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समन्वयक प्रा. कल्पना पै, मुख्य अन्वेषक प्रा. रिचा अश्मा, सह अन्वेषक प्रा. बी. बी. नाथ, डॉ. आरती नगरकर, डॉ. प्रिती चव्हाण, डॉ. तानिया बोस आणि डॉ. शशिकांत दुधगावकर आणि मुख्य शल्यचिकित्सक आणि जिल्हा रुग्णालय धाराशिवचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या सहकार्याने चालवला जातो.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्रा. कल्पना पै ह्या या प्रकल्पाच्या समन्वयक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली तज्ञांच्या समर्पित टीमसह, स्थानिक आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सहकार्याने डॉ. विवेकानंद जाधव धाराशिव जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये निदान केंद्रे स्थापन करणार आहेत. ही केंद्रे जेनेटिक टेस्टिंग आणि समुपदेशन सेवांसाठी महत्त्वाची केंद्रे म्हणून काम करतील, स्थानिक लोकांसाठी शाश्वत सेवा देतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading