Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; देशात सात टप्प्यात होणार मतदान 

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 19 एप्रिल पासून 1 जून 2024 दरम्यान देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच मतमोजणी 4 जून 2024 रोजी  होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी  निवडणूक आयुक्त एस. एस. सिंधू, ज्ञानेश कुमार यावेळी उपस्थित होते.

पहिला टप्पा –  19 एप्रिल 2024 मतदान 

दुसरा टप्पा –  26 एप्रिल 2024 मतदान 

तिसरा टप्पा –  7 मे 2024 मतदान 

चौथा टप्पा –  13 मे 2024 मतदान 

पाचवा टप्पा –   20 मे 2024 मतदान 

सहावा टप्पा –  25 मे 2024 मतदान 

सातवा टप्पा –  1 जून 2024 मतदान 

मतमोजणी 4 जून 2024 

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान; जाणून घ्या कोणत्या दिवशी? राज्यात कोणत्या ठिकाणी होणार मतदान  

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा (Maharashtra Lok Sabha seats) आहेत. या सर्व जागांवर पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यात विविध भागात 19 एप्रिल , 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे 2024 रोजी मतदान केले जाणार आहे.

19 एप्रिल 2024 – रामटेक, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर (विदर्भातील 5)

26 एप्रिल 2024 – वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

7 मे 2024 – राजगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर,माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर

13 मे 2024 – पुणे, मावळ, शिरूर, रावेर, नंदूरबार, जळगाव, जालना, संभाजी नगर, अहमदनगर, शिर्डी, बीड

20 मे 2024 – धुळे, दींडोरी, नाशिक, पालघर, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुंबई

निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, जगात जवळपास सर्व महत्वाच्या देशात निवडणुका होत आहेत. तसेच देशात 26 राज्यात लोकसभा निवडणूकी बरोबरच विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

  • देश सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
  • जम्मू काश्मीरमध्ये ही निवडणुका होणार
  • 16 जूनला 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे.
  • दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू आहे.
  • 97 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत.
  • 1.82 कोटी नवीन मतदार
  • 18 ते 21 वयोगटातील 21.50 कोटी मतदार
  • 48 हजार तृतीयपंथी मतदार आहेत.
  • जवळपास 2 लाख मतदार हे 100 वर्षा वरील आहेत.
  • 11 राज्यात महिला मतदारांची संख्या ही पुरूष मंतदारांपेक्षा जास्त आहे.
  • साडेदहा लाखा पेक्षा जास्त मतदान केंद्र देशात आहेत.
  • आमच्यावरील केसेस दोन वर्षात कमी झाल्या आहेत.
  • मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, टॉयलेट, लाईट, व्हीलचेअर असणार
  • 85 वयापेक्षा जास्त मतदारांना घरून मतदान करता येणार
  • फॉर्म 12 डी वयोवृद्ध व अपंग व्यक्तीसाठी दिला जाणार
  • ‘know your Candidate’ या app वर मंतदाराला आपल्या उमेदवारा विषयी माहिती मिळणार

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading