Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान; जाणून घ्या कोणत्या दिवशी? राज्यात कोणत्या ठिकाणी होणार मतदान  

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज याबाबद घोषणा केली. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा (Maharashtra Lok Sabha seats) आहेत. या सर्व जागांवर पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यात विविध भागात 19 एप्रिल , 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे 2024 रोजी मतदान केले जाणार आहे. तर 4 जून 2024 रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

कोणत्या दिवशी? राज्यात कोणत्या ठिकाणी होणार मतदान  

19 एप्रिल 2024 – रामटेक, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर (विदर्भातील 5)

26 एप्रिल 2024 – वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

7 मे 2024 – राजगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर,माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर

13 मे 2024 – पुणे, मावळ, शिरूर, रावेर, नंदूरबार, जळगाव, जालना, संभाजी नगर, अहमदनगर, शिर्डी, बीड

20 मे 2024 – धुळे, दींडोरी, नाशिक, पालघर, ठाणे, भिवंडी, कल्याण, मुंबई

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading