जयपोरचे नवीन एसएस’२४ कलेक्शन कालातीत कारागिरीच्या माध्यमातून स्प्रिंग/समर फॅशनला देत आहे नवीन रूप
दिल्ली : जयपोर या आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडमधील हस्तकलेवर आधारित लाइफस्टाइल ब्रॅण्डने, आराम आणि शैली यांचा मेळ घालणारे, स्प्रिंग समर’२४ हे कलेक्शन बाजारात आणले आहे. हवेशीर सुती वस्त्रातील अभिजात रंगछटा आणि सुखद सिल्हुट्समधून तयार करण्यात आलेले प्रत्येक उत्पादन उन्हाळ्यासाठी अत्यंत अनुकूल आहे आणि दिमाखदारही आहे. फुलांच्या नक्षीच्या तलम ड्रेसेसपासून सुबक शिवलेल्या कुर्ती व ट्युनिक्स आणि आरामदायी ट्राउजर्सपर्यंत, प्रत्येक कपड्यात अंगभूत शैली आणि सुती कापडाची घाम टिपून घेण्याची क्षमता यांचा संयोग आहे. सूर्यप्रकाशात तळपणारे दिवस आणि त्यानंतरच्या आल्हाददायक रात्री अशा दोहोंसाठी हे कपडे उत्तम आहेत.
हस्तकलेच्या सर्व उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतातील आघाडीच्या ब्रॅण्ड्सपैकी एक असलेल्या जयपोरच्या कपडे, दागिने, गृहसजावटीच्या वस्तू व अॅक्सेसरीज अशा अनेक श्रेणी आहेत. आधुनिक जीवनशैलीला अनुकूल अशा अस्सल भारतीय उत्पादनांचे डिझायनिंग, सोर्सिंग व रिटेलिंग यांच्या माध्यमातून, ब्रॅण्डद्वारे, भारतातील हस्तकला आणि पारंपरिक वस्तूंच्या भारतातील प्रदीर्घ वारशाचा आदर राखला जातो.
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या एथ्निक बिझनेस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूजर भट म्हणाले, “भारतातील पारंपरिक कारागिरीचा मेळ आधुनिक सौंदर्याशी घालण्याप्रती जयपोरची अविचल बांधिलकी एसएस’२४ या कलेक्शनमधून अधोरेखित होते. ग्राहकांना कालातीत कपडे, दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू पुरवण्याप्रती आमचे ठाम समर्पण यातून दिसून येते. याद्वारे आम्ही आधुनिकतेची कास धरतानाच आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशालाही वंदन करतो. नवीन एसएस’२४ या कलेक्शनमध्ये कालातीत अभिजाततेचा समावेशही आहे आणि त्याच वेळी या ऋतूला आवश्यक त्या सुटसुटीतपणाला व कारागिरीलाही प्राधान्य देण्यात आले आहे. हलकीफुलकी वस्त्रे, आकर्षक सिल्हुट्स आणि ब्लॉक प्रिंट, अजरख, हाताने केलेले भरतकाम, चिकनकारी, इकत कापड, आदिवासी दागिने, टेम्पल व फिलीग्री अलंकार अशा अनेक बाबींचा समावेश यात आहे. ग्राहकांच्या उन्हाळ्यासाठीच्या वॉर्डरोबसाठी तसेच घरासाठी ही उत्पादने उत्तम आहेत.”
जयपोरच्या एसएस’२४ या कलेक्शनमध्ये ब्लॉक प्रिंट, अजरख, हाताने केलेले भरतकाम, चिकनकारी, इकत आणि अशा अनेक अस्सल भारतीय कलाप्रकारांचा समावेश आहे. ‘लागोम’ श्रेणी ही आटोपशीर भौमितिक रचनांनी युक्त अशा बाउहाउस सौंदर्यशास्त्राने प्रेरित आहे. या श्रेणीत आधुनिक प्रभावांचा अखंडित मेळ पारंपरिक हस्तकलेशी घालण्यात आला आहे. या अनन्यसाधारण कलेक्शनमध्ये कोनीय आणि अमूर्त डिझाइन्सपासून प्रेरणा घेऊन अजरखची परंपरा उपयोगात आणली गेली आहे. समकालीन सुती वस्त्राला कारागिरी आणि आधुनिक संस्कृतीच्या संयोगाने सजवण्यात आले आहे.
रेषांमधून आकाराला आलेल्या फुलांच्या आकृत्या समृद्ध वारसा असलेल्या कलेच्या ब्लॉक प्रिटिंग कलेच्या माध्यमातून जिवंत करून काशनी कलेक्शन साकार झाले आहे. वसंतातील रंगछटांना गारुड करणाऱ्या लाल व निळ्या रंगांची जोड देऊन चैतन्यपूर्ण वस्त्रांचा पट विणला गेला आहे. एका प्राचीन हस्तकलेचे साक्षीदार असलेल्या लाकडी साच्यांचा स्पर्श या कलेक्शनमधील प्रत्येक सुती वस्त्राला झाला आहे.
जयपोरची एसएस २४ गौरी श्रेणी हे देवी पार्वतीला केलेले वंदन आहे. देवी पार्वती शुद्धता आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. हे श्वेत वस्त्रांवर श्वेत कारागिरी केलेले कलेक्शन अभिजात प्राचीन सिल्हुट्सने साकारलेले आहे. त्याला खडी ब्लॉक प्रिंटच्या राजेशाही वारशाची जोड आहे. सुती वस्त्राच्या पार्श्वभूमीवर बहारदार फुलांच्या स्वच्छ प्रतिमा, पारंपरिक आकृती आणि टेसेलेशन (सुटसुटीत भौमितिक रचना) आदींचे काम या कलेक्शनमध्ये बघायला मिळते.
उन्हाळ्यातील स्वप्नील भावनेपासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेले कॅमिला कलेक्शन पुष्पाकृतींची भाषा बोलते. हिरव्यागार ओअॅसिसची आठवण करून देणारे आणि जिवंतपणाने सळसळणारे हे कलेक्शन आहे. प्रत्येक आधुनिक वस्त्र हे फुलापानांच्या टवटवीत प्रतिमांनी सजलेले आहे, तुमच्या उन्हाळी सिल्हुट्समध्ये ही कला प्राण फुंकते. लिनन ब्लेण्ड पोताच्या पार्श्वभूमीवर ही कारागिरी आहे.
मुरलेल्या पेयातील रंगछटा, हाताने केलेल्या भरतकामाचे स्तर आणि वसंत-ग्रीष्म ऋतूंसाठी खास ब्लॉक-प्रिंटेड पट्टे यांची सरमिसळ म्हणजेच नाइशा कलेक्शन. सुती-रेशमी धाग्यांच्या मिश्रणातून विणलेल्या वस्त्रांना ताज्या फुलांच्या गादीचा भास निर्माण करणाऱ्या उजळ आकृत्यांनी सजवण्यात आले आहे. या कपड्यांकडे नजर जाताच एक ताजीतवानी, सुखद भावना निर्माण होते. कुशल भरतकामाने नाजूकपणे वस्त्राचे सौंदर्य खुलवण्यात आले आहे.
जयपोरच्या एसएस’२४मधील चिप्पा आणि आदिर ही कलेक्शन्स पुरुषांसाठी आहेत. चिप्पा म्हणजे पुरुषांच्या सुती कपड्यांतील काहीशा भव्य सिल्हुट्सचे कलेच्या माध्यमातून केलेले आधुनिक रूपांतर आहे. त्यातून अभिजातता उठून दिसते. हाताने दाब देऊन केलेल्या दाबु नावाने ओळखल्या जाणाऱ्या ब्लॉक प्रिटिंगचे काहीसे रांगडे मर्म यात आहे. चिखलाचा परिणाम कपड्यांवर होऊ नये म्हणून वापरले जाणारे दाबु हे आठव्या शतकातील तंत्र आहे. राजस्थानातील अकोला येथे दाबूचा उगम झाला. ही कला आता पुन्हा जिवंत करण्यात आली आहे.
आदीर ही पुरुषांच्या कपड्यांची श्रेणी म्हणजे पट्टेदार ब्लॉक प्रिंट्सच्या दिव्य नृत्याने सजलेल्या ताण्याबाण्यांचे दर्शन आहे. प्रत्येक उत्पादन म्हणजे सूर्याला स्पर्श करणाऱ्या क्षितिजाची आठवण करून देणाऱ्या संस्मरणीय रेषांनी रंगलेला, वाऱ्याने पुसल्या जाणाऱ्या वाळूच्या टेकड्यांचे नमुने तंतोतंत दाखवणारा पट आहे. उन्हाळ्याच्या सुखद मर्माची कथा सांगणाऱ्या रांगड्या छटा आणि रेखांमधील सौहार्द अनुभवण्याची संधी हे कलेक्शन देते.
जयपूरच्या प्रत्येक शैलीमध्ये एक कथा दडलेली आहे. ही कथा आपला उन्हाळा अधिक संस्मरणीय करेल. कोणतीही जुळणी योग्य अॅक्सेसरीजशिवाय एका सूत्रात बांधली जात नाही, हे तर खरेच. म्हणूनच ब्रॅण्डने कारागिरीतून तयार झालेल्या अॅक्सेसरीजचा समावेशही एसएस’२४ कलेक्शनमध्ये केला आहे. चांदीचे शोभिवंत आदिवासी दागिने, जोधपुरी फिलिग्री (नाजूक नक्षिकाम) नेकलेसेस, घुंगरुंनी सजवलेले झुमके कोणत्याही लूकवर शोभून दिसतात आणि जयपोरच्या एसएस’२४ कलेक्शनची शोभाही वाढवतात.
