ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हल पुण्यात उत्साहात संपन्न
पुणे : नवीन फॅशन ट्रेंड्स,म्युझिक डीजे आणि कलाकारांच्या उपस्थित पुण्यात उत्साहपूर्ण वातावरणात ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हल संपन्न झाला. ह्या सोहळ्यात विविध लक्झरी फॅशन ब्रॅंड्सचे अत्यंत स्टायलिश अनुभव, भारतातील काही उत्कृष्ट लाइफस्टाइल ब्रॅंड्सने बनवलेले वेधक पॉप-अप्स आणि लोकप्रिय कलाकारांनी दिलेले लयदार संगीत परफॉर्मन्सेस पुणेकरांसाठी महत्वपूर्ण ठरले. या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहिलेल्या लोकांना फॅशन आणि स्टाइलने ओतप्रोत असा एक आकर्षक नाव अनुभव मिळाला. या फेस्टिवल मध्ये प्रख्यात डिझाईनर वरुण बहलने बनविलेल्या वैविध्यपूर्ण आकर्षक कपड्यांच्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. .या सादरीकरणात भारतातील आघाडीचे डिझाईनर अल्पना नीरज, ब्लोनी अंतर अग्नी, मंदिरा विर्क, गीशा डिझाईन्स, वेरान्डा, श्वेता कपूर, तानिया खनुजा आणि नितीन बाल चौहान सहभागी होते. तसेच वरुण बहलचे प्रीमियम कलेक्शन बॉलिवूड अभिनेत्री सुंदर अभिनेत्री अदिती राव हैदरीने सादर केले .
या फेस्टिव्हलमध्ये नाशेर माइल्स, अनिशा गांधीची द स्टाइलिंग रूम, जॉन जेकब्स, ऑल यू कॅन स्ट्रीट, डूडल मॅपल्स, मायग्लॅम आणि ऑडी पुणे या लाइफस्टाइल ब्रॅंड्सच्या सहयोगाची एक शृंखला देखील सादर करण्यात आली. डीजे कायानचा आणि ऋत्विजचा रॉकिंग सेगमेन्ट या जबरदस्त संगीत परफॉर्मन्सेसमुळे वातावरण उत्साहाने भारून गेले होते. या ठेक्यावर थिरकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. व्हीजे आणि अभिनेत्री अनुशा दांडेकरने या समारंभाचे सूत्रसंचालन केले.
पेरनॉड रिकार्ड इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक मोहिन्द्र म्हणाले, “आपण भारतातील फॅशनचा चेहरा-मोहरा बदलत असताना ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हल एक आकर्षक नवीन फॉरमॅट घेऊन आले आहे, जो नवनवीन शहरांत एक उदाहरण स्थापित करत आहे. स्टाइल आणि ग्लॅमरच्या दुनियेत एक आकर्षक गेटवे बनण्याच्या आमच्या व्हिजनशी मिळत्या जुळत्या भारतातील काही फॅशन डिझाईनर्सशी, सेलिब्रिटीजशी आणि लाइफस्टाइल ब्रॅंड्सशी सहयोग करताना आम्ही रोमांचित आहोत.”
फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलविषयी बोलताना डिझाईनर वरुण बहल म्हणाला की , “ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने पुण्यात एक वेधक, अनोख्या प्रकारचा फॅशन फेस्टिव्हल अनुभव दिला. माझ्या कलेक्शनचा मुख्य चेहरा असलेल्या अदिती राव हैदरीसोबत फॅशन अनुभवाचे नवीन रूप अभिव्यक्त होताना पाहण्याचा अनुभव गौरवाची जाणीव देणारा होता.”
अदिती राव हैदरी म्हणाली, “भारतातील पहिलेवहिले फॅशन फेस्टिव्हल सुरू करून ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने पुण्यात स्टाइल आणि ग्लॅमरच्या भविष्याचे दर्शन घडवले. वरुणचे कलेक्शन त्याची सिग्नेचर स्टाइल दर्शवते आणि रेड कार्पेट फॅशनमधल्या भावी फॅशनचे ग्लॅमरस अर्थघटन करते. त्याने डिझाईन केलेले अनोखे पोशाख परिधान करून रॅम्प वॉक करण्याचा अनुभव अद्भुत होता.”
ब्लेंडर्स प्राइड ग्लासवेअर फॅशन नेक्स्टचे क्यूरेटर-इन-चीफ आशीष सोनी म्हणाले, “ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने भारतातील फॅशन अनुभवात एक आकर्षक बदल घडवून आणला आहे. यात केवळ भावी ट्रेंड्सचे प्रदर्शन नाही, तर या मंचाने हाय फॅशन, ग्लॅमरस स्टाइल आणि एक आकर्षक फेस्टिव्हल अनुभव नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते.”
