खडकवासला मतदारसंघात विविध ठिकाणी मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचे आव्हान करण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायत खेड शिवापुर येथे राष्ट्रीय मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांना मतदान करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला मंडळ अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला, मनीषा भोंगळे, शिल्पा परळीकर, सरपंच, उपसंरपंच यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
धनकवडी येथील अनंत शिक्षण संस्थेचे प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल व नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे वामनराव ओतूरकर माध्यमिक विद्यालय येथे मतदार जागरूकता अभियान कार्यक्रमात मतदान संकल्पपत्र घेण्यात आले. तसेच शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारीवर्गाने मतदार प्रतिज्ञा घेतली.
