टीव्हीएस आयक्यूबची महाराष्ट्रात आगेकूच कायम, ५८,००० युनिट्स विक्रीचा विक्रमी टप्पा पार
पुणे – टीव्हीएस मोटर कंपनी या दोन चाकी व तीन चाकी वाहन क्षेत्रात आघाडीवर असेलल्या जागतिक उत्पादक कंपनीने महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत टीव्हीएस आयक्यूब सीरीजच्या ५८,००० युनिट्स विक्रीचा लक्षणीय टप्पा गाठल्याचे जाहीर केले. देशभरात टीव्हीएस आयक्यूबची २.५ लाख युनिट्सची विक्री झाली असून इलेक्ट्रिक वाहतुकीचा वेगाने प्रसार होत असल्याचे ते सुचिन्ह आहे.
इलेक्ट्रिक वाहतुकीची ही क्रांती पुढे नेत टीव्हीएस मोटर कंपनीने ग्राहकांना फेम II लाभासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमध्ये टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर १८,४९९ रुपयांपर्यंतच्या लाभ योजनेचा फायदा मिळवता येतील. टीव्हीएस आयक्यूब श्रेणीची किंमत १,२९,१०५ रुपयांपासून सुरू होते.
टीव्हीएस आयक्यूबमध्ये शहरी वाहन चालकांसाठी आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यात ३.४ केडब्ल्यूएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी तब्बल १०० किमीची रेंज देते. टीव्हीएस आयक्यूब चालकाला प्रवासाचा सुखद आणि विश्वासार्ह अनुभव देते. सीटखाली ३२ लीटर्सचे मोठे स्टोअरेज देण्यात आल्यामुळे चालकाची चांगली सोय होते. त्याशिवाय मोठा फुटबोर्ड, रूंद सीट्समुळे ही स्कूटर वापरण्यास सोपी आहे.
त्याशिवाय ग्राहकांना या गाडीच्या खरेदीनंतर पुढच्या तीन वर्षांत १.२ लाख रुपयांची बचत करणे शक्य होणार आहे, कारण या गाडीच्या देखभालीचा खर्च अतिशय कमी म्हणजेच प्रति किलोमीटर ३० पैसे . ११८ कनेक्टेड वैशिष्ट्ये, ७ टीएफटी आणि क्लीन युआय, व्हॉइस असिस्ट, टीव्हीएस आयक्यूब अलेक्सा स्किलसेट, म्युझिक प्लेयर कंट्रोल, ओटीए अपडेट्स, फार्स्ट चार्जिंग, प्लँड अँड प्ले कॅरी अलांग चार्जर, रिव्हर्स पार्तिंग असिस्टन्स, वाहनाचे ट्रॅकिंग, वाहनाची तपासणी व सुरक्षेविषयी नोटिफिकेशन्स यांसह टीव्हीएस आयक्यूबने स्मार्ट व अंतर्ज्ञानी शहरी वाहतुकीचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.
आतापर्यंत अडीच लाख ग्राहकांना टीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिकची खरेदी केली आहे. यावरून ईव्हीकडे होत असलेले राष्ट्रीय स्थित्यंतर दिसून येते. ईव्हीच्या या आकर्षक प्रवासात टीव्हीएस मोटर कंपनीने तीन प्रेरणादायी तत्वांचा अवलंब केला आहे. ग्राहकांना रेंज, कनेक्टेड क्षमता आणि रंगाबाबत पॉवर ऑफ चॉइस देणे. सुरक्षेच्या सर्व आधुनिक नियमांचे पालन करून त्यांना पीस ऑफ माइंड देणे, तसेच टीव्हीएस आयक्यूबच्या खरेदीपासून वितरणापर्यंतची प्रक्रिया सोपी करत ग्राहकांना सिम्प्लीसिटी ऑफ ऑपरेटिंगचा अनुभव देणे यांचा त्यात समावेश आहे.
सध्या ही स्कूटर देशातील ३४८ शहरे व ६१२ वितरकांकडे उपलब्ध करण्यात आली आहे.
