Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित महिलांमध्ये लव्ह जिहादच्या प्रकरणात वाढ – काजल हिंदुस्तानी

पुणे : आज बॉलीवूड, सोशल मीडिया, अमली पदार्थ आणि भीतीचे वातावरण निर्माण करून लव्ह जिहादचे प्रमाण वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता विवाहित महिलांमध्ये देखील लव्ह जिहादच्या प्रकरणात वाढत होताना दिसत आहे. प्रत्येक दहा मागे सहा प्रकरणे ही विवाहित महिलांची असल्याचे दिसत आहे. कारण आजच्या मातांनी जिजामाता होणेच सोडले आहे. माता ही समाजाची निर्माता आहे. त्यांनी आज मुलींना शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे देणे तितकेच महत्त्वाचे झाले आहे, असे मत प्रसिद्ध व्याख्यात्या काजल हिंदुस्तानी यांनी केले.

बिबवेवाडी येथील श्री सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिरात काजल हिंदुस्तानी यांच्या जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे अनुराधा हजारे, शोभा कल्याणी, जोईजोडे व मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. यावेळी लव्ह जिहादची वाढती प्रकरणे, महिला व मुलींना आजच्या काळात स्वसंरक्षणाची वाढती गरज, जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, राणी नायकी देवी, हादी राणी व इतर रणरागिणी यांची माहिती सांगितली.

काजल हिंदुस्तानी म्हणाल्या, आज महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, राणी दुर्गावती राणी, राणी नायकी देवी, राणी पद्मिनी या स्वतःच्या अस्मितेसाठी लढल्या. त्यांनी बलिदान दिले ,परंतु मुघलांच्यासमोर हार मानली नाही. मग आज २०२४ मध्ये महिला इतक्या दुर्बल का होत आहेत? आणि यासारख्या घटना आपल्याकडे का घडत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

मंदिरात नुकतेच पुषपेंद्र कुलश्रेष्ठ यांनी देखील अश्याच प्रकारे मंदिर आणि त्या मागील शास्त्र व इतिहास या विषयावर मार्गदर्शन केले होते. मंदिरात असे अनेक सामाजिक, सांस्कृतिक अद्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम सातत्याने आयोजिले जातात. पूजा हजारे यांनी सूत्रसंचालन केले. मिनल हजारे यांनी प्रास्ताविक केले. तसेच श्रोतरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading