Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

केंद्रीय वीज प्राधिकरण साजरा करणार ‘लाईनमन दिवस’

पुणे : ऊर्जा मंत्रालयाच्या केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या (सीईए) वतीने टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्यूशन (टाटा पॉवर – डीडीएल) यांच्या सहकार्याने चौथा लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. देशभरातील राज्य आणि खासगी वितरण व संवहन कंपन्यांसाठी ‘लाईनमन दिवस’ म्हणून एक विशेष साजरा करण्याची परंपरा निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे. भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील तळाचे कर्मचारी असणाऱ्या लाईनमनचा त्यातून सन्मान करण्यात आला. ऊर्जा क्षेत्रातील तळाचे कर्मचाऱ्यांंचे नीतिधैर्य उंचावणारा असा हा उपक्रम ठरला. त्यांच्या हक्काची असलेली मान्यता व कौतुक त्यांना त्यातून मिळाले.

ट्रान्सकोस आणि डिस्कॉम्समधील लाईनमेन आणि लाइन वूमन यांचा नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड चे हेमेंद्र गौर, प्रकाश पाटील, महेश कुमार वडचकर, हंसा कुर्वे, श्रावणी शेलार आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड चे मल्लेश जोगू आणि अशोक वाझे सत्कार करण्यात आला.

लाईनमन दिवस साजरा करण्याचा यंदाचा विषय ‘सेवा, सुरक्षा, स्वाभिमान’ हा होता. त्यातून ऊर्जा क्षेत्रातील तळाच्या नायकांची निष्ठा, सेवा आणि त्याग अधोरेखित होतो. या कार्यक्रमात लाईनमनना आपल्या कल्पनांचे आदानप्रदान करण्याची तसेच सर्वोत्तम सुरक्षा उपायांची चर्चा करण्याची संधी मिळाली. यामुळे ऊर्जा उद्योगातील सामूहिक शिक्षणाला खतपाणी मिळते. विविध सुरक्षा उपकरणे आणि अवजारे यांचे विशेष प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते.

केंद्र सरकारच्या नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग म्हणाले लाईनमन दिवस हा सहभागी व्यक्तीमध्ये कल्पनांचे तसेच सुरक्षेच्या सर्वोत्तम उपायांचे आदान प्रदान करण्यासाठी एक परिणामकारक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. देशाच्या तंत्रज्ञानात्मक, औद्योगिक आणि सामाजिक मूलभूत सुविधांसाठी अखंड वीज पुरवठा निश्चित करण्यासाठी अत्यंत कष्ट उपसणाऱ्या लाईनमन्सबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

यावेळी बीज भाषण करताना केंद्रीय वीज प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री घनश्याम प्रसाद म्हणाले, “ऊर्जा क्षेत्रातील लाईनमन हे आपल्या देशाच्या ऊर्जा व्यवस्थेचे सर्वात भक्कम स्तंभ आहेत. लाईनमन दिवस साजरा करण्यातून त्यांच्या निष्ठा आणि अखंड सेवेबद्दल आपल्या मनात असलेले कौतुक दिसून येते. तळाच्या या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करण्याचा उद्देश हा त्यांना सुरक्षेबाबत शिक्षित करणे तसेच त्यांचे आदर्श प्रयत्न चालू ठेवण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे हा आहे.”

या कार्यक्रमाला सीईए आणि अन्य संवर्धन व वितरण कंपन्यांचे वरिष्ठ सदस्य उपस्थित होते अशोककुमार राजपूत, सदस्य (पॉवर सिस्टिम्स); बालन, सदस्य (नियोजन), अजय तळेगावकर, सदस्य (ई अँड सी); प्रवीण गुप्ता, सदस्य (औष्णिक) आणि विनीत सिक्का, सीईओ, बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेड; अमरजीत सिंग, सीईओ, बीएसईएस यमुना पॉवर लिमिटेड आणि उपसंचालक, एनपीटीआय

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading