Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

टॅलि सोल्युशन्स पुण्यातील ६ लाख एमएसएमईज् ना अकाऊंट अॅग्रिगेटर फ्रेमवर्क घेण्यासाठी सहाय्य करणार

पुणे :  व्यवसाय व्यवस्थापन सॉफ्टवेअर (बिझनेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर- BMS) उद्योग क्षेत्रातील एक आघाडीचे नाव असलेल्या टॅलिसोल्युशन्सने पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ६ लाख एमएसएमईज् ना अकाऊंट अॅग्रिगेटर फ्रेमवर्क (AA) च्या फायद्यांबद्दल प्रशिक्षित करण्याची घोषणा केली. ओपन-बँकिंग इकोसिस्टमला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने २०१६ मध्ये एए फ्रेमवर्क सुरू केले होते. याच अनुषंगाने टॅलिने आपली उपकंपनी टॅलि अकाऊंट अॅग्रिगेटर सर्विस प्रायव्हेट लिमिटेड (Tally Account Aggregator Services Pvt Ltd) स्थापन केली. टॅलि एज (TallyEdge) च्या सहाय्याने  वापरकर्त्यांना वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडील त्यांची सर्व आर्थिक माहिती सहजतेने एकाच ठिकाणी एकत्रित करता येते. शिवाय, टॅलि एजच्या (TallyEdge) मदतीने ही माहिती सुरक्षितपणे पाहता येते आणि केवळ वापरकर्त्याच्या परवानगीने रिअल-टाइममध्ये शेअर देखील करता येते.

महाराष्ट्रात ४ लाखांहून अधिक एमएसएमईज् उदयममध्ये नोंदणीकृत आहेत. आपल्या डिजिटल प्रवासाचा एक भाग म्हणून अकाऊंट अॅग्रिगेटर घेतल्यानंतर या कंपन्या या सॉफ्टवेअरचा लाभ घेऊ शकतात. माहिती पाहताना व हाताळताना १०० टक्के खात्रीशीर सुरक्षिततेची हमी आणि वापरकर्त्याची परवानगी असेल तर वित्तीय संस्थांसोबत सहजपणे माहिती शेअर करता येण्याची सुविधा  याच बरोबर टॅलि एज (TallyEdge) एमएसएमई ना कर्ज देणाऱ्या परिसंस्था व  इतर वित्तीय सेवांमध्ये सुलभ प्रवेश मिळवून देण्यात मदत करेल. उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार, देशात २५ लाख कोटी (ट्रिलियन) एवढी लक्षणीय पत तफावत (क्रेडिट गॅप) आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राने २०% एवढी सर्वाधिक कर्ज मागणी नोंदवली आहे. ही क्रेडिट गॅप कमी करण्यासाठी एमएसएमई परिसंस्थेला प्रशिक्षित करणे आणि एए च्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे हे टॅलीचे उद्दिष्ट आहे.

टॅलिसोल्युशन्सच्या पश्चिम झोनचे महाव्यवस्थापक समीर दीक्षित यांच्या मते, “व्यवसायव्यवस्थापनसॉफ्टवेअर (बिझनेसमॅनेजमेंट  सॉफ्टवेअर – BMS) क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी  म्हणून सध्या आमच्याकडे देशातील ७५% बाजारपेठ आहे आणि महाराष्ट्र यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. टॅलि एज (TallyEdge) च्या माध्यमातून औपचारिक कर्ज मिळवण्याच्या आव्हानांना तोंड देत असलेल्या एमएसएमई ना आमचे सहाय्य व आमचा पाठिंबा अजून वाढवणे हे आमचे ध्येय आहे. एए फ्रेमवर्क आणि उद्योग क्षेत्रासाठी त्याच्या  संभाव्य महत्त्वाची  समज वाढवण्यासाठी आम्ही येत्या काही महिन्यांत आमच्या सहभागीदारांसह  आणि उद्योग संस्थांसह जागरूकता व प्रशिक्षण सत्रांची मालिका पुण्यात आयोजित करणार आहोत.”

टॅलिसोल्युशन्सच्या वित्तीय सेवा विभागाचे महाव्यवस्थापक विकास शेट्टी म्हणाले,“एमएसएमई परिसंस्था आणखी वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेसह, आम्ही पुढील ३ वर्षांमध्ये भारतातील सुमारे २० लाख व्यवसायांना टॅलि एज (TallyEdge) वर आणण्याची आकांक्षा बाळगतो. टॅलि एज (TallyEdge) वापरकर्त्यांना त्यांच्या माहितीवर सर्वसमावेशक नियंत्रण मिळवून देते. त्यांना  कोणत्याही महितीला शेअर करण्याच्या विनंत्या मंजूर करणे वा नाकारणे, थांबवणे  किंवा मागे घेणे हे या सॉफ्टवेअरद्वारे सहजतेने करता येते. आम्हाला विश्वास आहे की, टॅलि एज (TallyEdge) च्या माध्यमातून आम्ही केवळ या प्रदेशातील अकाऊंट एग्रिगेटर परिसंस्थाचमजबूत करु असे नाहीतर अधिकाधिक  एमएसएमईंना त्यांचे विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी सक्षम देखील बनवू.”

सुरुवातीच्या टप्प्यात त्यांच्या भागीदारांच्या विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून जागरुकतेचे आणि प्रशिक्षणाचे प्रयत्न केले जातील. त्यानंतर ब्रँड आपली पोहोच वाढवण्यासाठी मोठ्या वित्तीय संस्थांसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे. या प्रयत्नांद्वारे,  एमएसएमईचा औपचारिक कर्ज प्रवास सुलभ करण्यासाठी भरीव योगदान देण्याचे टॅलीचे उद्दिष्ट आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading