Saturday, June 6, 2026
Latest NewsTECHNOLOGY

वी ने महाराष्ट्र आणि गोव्यातील आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणले इसिम (esIM)

 
आघाडीची टेलिकॉम कंपनी वी ने महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रीपेड ग्राहकांसाठी इसिम सेवा सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. लाखो भारतीयांसाठी अखंडित, अधिक वेगवान आणि पर्यावरणस्नेही कनेक्टिव्हिटी पुरवण्याच्या दिशेने कंपनीने हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे.
कॉम्पॅटिबल स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच डिव्हाईसमध्ये इसिम वापरणाऱ्या वी प्रीपेड ग्राहकांना अधिक जास्त सुविधा आणि लवचिकतेचा अनुभव घेता येईल. इसिम एकाच डिव्हाईसवर अनेक वेगवेगळ्या प्रोफाईल्सना सपोर्ट करते, त्यामुळे प्रायमरी सिम न काढता दुसरे सिम कार्ड अगदी सहजपणे वापरता येऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे इसिम हे शाश्वततेच्या, पर्यावरणपूरकतेच्या दिशेने उचलण्यात आलेले पुढचे पाऊल आहे, हे अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळवून देते तसेच याच्या साहाय्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा सहजपणे स्वीकार करता येतो. या लॉन्चमुळे प्रीपेड व पोस्टपेड असे सर्व वी ग्राहक त्यांच्या हॅन्डसेटवर इसिमचे लाभ घेऊ शकतील.
वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड श्री रोहित टंडन यांनी सांगितले, "वी मध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना अधिकाधिक सुविधा व मूल्य प्रदान करणाऱ्या सेवा व उत्पादने सादर करण्याला महत्त्व देतो. इसिम (eSIM) तंत्रज्ञानाचा आम्ही केलेला स्वीकार आमच्या ग्राहकांच्या बदलत्या आणि वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठीचे आणि शाश्वत भविष्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठीचे आमचे
सातत्यपूर्ण प्रयत्न दर्शवतो." तुमच्या फोनवर वी इसिम (eSIM) मिळवण्यासाठी –
वर्तमान ग्राहक
● "eSIM <space> registered email id" हा एसएमएस १९९ वर पाठवून प्रक्रिया सुरु करा.
● जर तुमचा ईमेल आयडी वैध असेल तर तुम्हाला एक कन्फर्मेशन एसएमएस येईल. इसिम (eSIM) बदल विनंतीची पुष्टी करण्यासाठी मेसेज आल्यानंतर १५ मिनिटांच्या आत "ESIMY" हा मेसेज पाठवा.
● तुम्ही कन्फर्मेशन मेसेज पाठवल्यानंतर, कॉलवर अनुमती देण्याची विनंती करणारा अजून एक एसएमएस तुम्हाला येईल.
● कॉलवर अनुमती कळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक क्यूआर कोड येईल. सेटिंग्स>मोबाईल डेटा>ऍड डेटा प्लॅन याठिकाणी जाऊन तुम्हाला तो क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.
● आवश्यकता भासल्यास, सेकंडरी सिमसाठी डेटा प्लॅन लेबल रीनेम करा किंवा ही प्रक्रिया पुढे सुरु ठेवा.
● तुमच्या डिव्हाईससाठी डिफॉल्ट लाईन (प्रायमरी/सेकंडरी) निवडा आणि Done वर क्लिक करा.
● तुमचे इसिम (eSIM) ३० मिनिटांमध्ये ऍक्टिवेट होईल.
नवीन ग्राहक

● जवळच्या वी स्टोरमध्ये जाऊन, ओळख दर्शवणारा पुरावा दाखवून तुम्ही इसिम (eSIM) मिळवू शकता. ऍक्टिवेशन प्रक्रिया अधिक सहजपणे करता येईल व तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रक्रिया पार पडल्याचा अनुभव घेता येईल.
● वी ने आपल्या प्रीपेड ग्राहकांना सहजसुलभ ऍक्टिवेशन प्रक्रियेचे लाभ मिळावेत यासाठी  www.myvi.in वर ऑनलाईन प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. वी इसिम (eSIM) आयओएस आणि अँड्रॉइड युजर्सना वापरता येईल. ही सेवा ज्यावर वापरता येईल अशा स्मार्टफोन्सची यादी पुढे दिली आहे:

वी इसिम (eSIM) कार्ड्स मिळवण्यासाठी पात्र वी ग्राहक 'Email <space> Email ID' हा एसएमएस १९९ या क्रमांकावर पाठवून प्रीपेड ग्राहक त्यांचा ईमेल आयडी अपडेट करू शकतात. ईमेल आयडी रजिस्टर केल्यानंतर ४८ तासांनंतर एसएमएसमार्फत इसिम (eSIM) सेवा मिळवता येईल. वी इसिम (eSIM) सेवा आणि तिच्या लाभांविषयी अधिक माहितीसाठी कृपया वी ची अधिकृत वेबसाईट पहा किंवा जवळच्या वी स्टोरला भेट द्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading