Wednesday, November 11, 2026
ENTERTAINMENTLatest News

टेलिव्हिजन कलाकारांचे मुंबईतील पहिले घर!

 

टेलिव्हिजन कलाकार स्‍वप्‍ननगरी मुंबई शहरातील त्‍यांच्‍या पहिल्‍या घरांबाबत सांगत आहेत. या कलाकारांनी राहण्‍याच्‍या जागेचे क्षणिक स्‍वरूप, लहान घरांपासून इतरांसोबत जागा शेअर करण्‍याच्‍या आव्‍हानांचा सामना केला. त्‍यांची भाड्याची घरे कोकून ठरली, जेथे त्‍यांच्‍या कलेला वाव मिळाला. तो त्‍यांच्‍या विनम्र सुरूवातीचा काळ होता, ज्‍याने त्‍यांच्‍या भावी यशाला आकार दिला. स्‍टार कलाकारांच्‍या या अनुभवाला उजाळा देत असताना भाड्याच्‍या घरांना स्‍वर्ग म्‍हटलेल्‍या या कलाकारांना प्रशंसित केले पाहिजे. यापैकी काही कलाकार आहेत नेहा जोशी (मालिका ‘अटल’मधील कृष्‍णा देवी वाजपेयी), योगेश त्रिपाठी (मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील दरोगा हप्‍पू सिंग) आणि रोहिताश्‍व गौड (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील मनमोहन तिवारी). मालिका ‘अटल’मधील नेहा जोशी (कृष्‍णा देवी वाजपेयी) म्‍हणाल्‍या, ”मुंबईमध्‍ये माझ्या सुरूवातीच्‍या दिवसांमध्‍ये मी माझ्या मैत्रिणींसोबत एका महिलेच्‍या घरी पेईंग गेस्‍ट म्‍हणून राहिले, त्‍यांना मी प्रेमाने ‘आजी’ म्‍हणायचे. पण अनपेक्षित स्थितींमुळे मला ते घर सोडावे लागले. त्‍यानंतरचा काळ माझ्या जीवनातील सर्वात आव्‍हानात्‍मक होता. मी चार ते पाच वेगवेगळ्या घरांमध्‍ये राहिले. आजीच्‍या निवासामधून बाहेर पडल्‍यानंतर मी तात्‍पुरती ठाणे येथे माझ्या चुलत बहिणीसोबत राहिले. पण प्रवासामुळे दमछाक होत असल्‍यामुळे मी ते घर देखील सोडले. रंगभूमीवर काम करताना मी एका दिग्‍दर्शकाला भेटले, ज्‍याने मला तात्‍पुरती राहण्‍याची जागा दिली. त्‍यानंतर मी प्रभादेवीला आले, आणखी एका नातेवाईकासोबत तेथे राहिले. दुर्दैवाने त्‍या घराच्‍या मालकाने मदत केली नाही आणि माझ्या अभिनय प्रोफेशनवर टिका केली, ज्‍यामुळे तो काळ खूप आव्‍हानात्‍मक ठरला. कामाच्‍या निमित्ताने मला काही दिवस स्‍थानिक बसमधून नाशिकला जावे लागत होते, ज्‍यामुळे अभिनयाच्‍या संधी हुकल्‍या. त्‍यानंतर माझी जिवलग मैत्रिण शर्वरी लोहोकरे माझ्या मदतीस धावून आली, तिने तिच्‍या नातेवाईकाच्‍या घरी माझी राहण्‍याची सोय केली, जेथे मी आणखी एका रूममेटसोबत राहत होती. असा आव्‍हानात्‍मक काळ असताना देखील मी या संघर्षमय टप्‍प्‍यादरम्‍यान तिच्‍या सहवासाचा आनंद घेतला.”
मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी (दरोगा हप्‍पू सिंग) म्‍हणाले, ”मुंबईमधील माझे पहिले घर रेल्‍वे स्‍टेशन होते. मला आठवते, मला कुठेही जायचे नव्‍हते ज्‍यामुळे जवळपास चार दिवस विविध स्‍टेशन्‍सवर झोपत होतो. या स्थितीमुळे अस्‍वस्‍थ झालेलो मी मनाशी ठाम निश्‍चय केला की ‘मी या शहरामध्‍ये स्‍थायिक होण्‍यास यशस्‍वी झालो तर किमान चार घर खरेदी करेन’. सुदैवाने देवाने माझे ऐकले आणि आता मुंबईमध्‍ये माझ्या अनेक प्रॉपर्टीज आहेत. मी चार मित्रांसह २००५ मध्‍ये मुंबईत आलो. सुरूवातीला आम्‍हा बॅचलर्सना राहायला घर मिळणे आव्‍हानात्‍मक ठरले. सुदैवाने आम्‍हाला वाशी येथे राहायला लहान खोली मिळाली. काहीही संकोच न करता राहायला जागा मिळाल्‍याच्‍या आनंदाने आम्‍ही तेथे गेलो. मी दररोज वाशी ते अंधेरी प्रवास करायचो आणि १४ ते १५ तासांचे काम पूर्ण केल्‍यानंतर प्रवासासाठी जवळपास २ ते ३ तास लागायचे. कधी-कधी शेवटची ट्रेन चुकायची आणि वाशीला परतण्‍यासाठी कोणतेच माध्‍यम नसल्‍यामुळे रेल्वे स्‍टेशनवर संपूर्ण रात्री व्‍यतित करावी लागायची.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्‍व गौड (मनमोहन तिवारी) म्‍हणाले, ”माझ्या करिअरच्‍या सुरूवातीला मी १८० चौरस फूटाच्‍या लहान खोलीमध्‍ये राहिलो, जेथे माझ्यासोबत तीन महत्त्‍वाकांक्षी व्‍यक्‍ती होत्‍या, जे चित्रपटसृष्‍टीत छाप निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करत होते. त्‍या खोलीमध्‍ये लहान किचन व बेडरूम होते. मला आठवते, आम्ही महिन्‍याला १५०० रूपये भाडे द्यायचो, जे हळूहळू वाढत गेले. माझ्या सुरूवातीच्‍या काळात राहिलेल्‍या या घराचे माझ्या मनात खास स्‍थान आहे. त्‍या घरामध्‍ये चित्रपटसृष्‍टी आपली छाप निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या रूममेट्सचा संघर्ष पाहिला. मर्यादित सुविधा असताना देखील त्‍या घरामधून मी अभिनेता व व्‍यक्‍ती म्‍हणून प्रगती केली. माझ्या जीवनप्रवासातील चढ-उतारादरम्‍यान ते घर माझे सोबती होते. मी त्‍या घराशी मनाने जुडलो होतो, ज्‍यामुळे विवाहानंतर स्‍वत: ते घर विकत घेण्‍याचे ठरवले. मी ९०च्‍या दशकात दीड लाख रूपयांना ते घर खरेदी केले आणि माझ्या पहिल्‍या मुलीचा जन्‍म त्‍याच घरात झाला. या घराशी माझा संघर्ष, यश आणि माझ्या सुरूवातीच्‍या काळाच्‍या प्रेमळ आठवणी जोडलेल्‍या आहेत.”
तुमच्‍या आवडत्‍या कलाकारांना पाहण्‍यासाठी पाहत राहा मालिका ‘अटल’ रात्री ८ वाजता, ‘हप्‍पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a Reply