Saturday, June 6, 2026
BusinessLatest News

जावा येझ्दी मोटरसायकल्सतर्फे पुण्यात मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन

पुणे : जावा येझ्दी मोटरसायकल्स आपल्या यशस्वी मेगा सर्व्हिस कॅम्पचे पुण्यात आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. राज्यभरात विविध ठिकाणी केलेल्या यशस्वी आयोजनानंतर हा दोन दिवसीय उपक्रम पुण्यात ६ आणि ७ मार्च रोजी होणार आहे.

या दरम्यान शहरातील २०१९-२०२२ जावा ग्राहकांना सेवेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.

हा सर्व्हिस कॅम्प प्लॉट क्रमांक. जीपी- १८७, लोअर ग्राउंड, ड्रीमहाउस (मारूती थरमॅक्स चौक), चिंचवड, पुणे, महाराष्ट्र ४११०२१ येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कॅम्पचा एक भाग म्हणून २०१९- २०२० या कॅम्पमध्ये २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना त्यांच्या गाडीची संपूर्ण तपासणी आणि निवडक भागांचे मोफत रिप्लेसमेंट करून मिळेल. आघाडीचा ओरिजनल इक्विपमेंट पुरवठादार या कॅम्पमध्ये सहभागी होऊन ग्राहकांना मदत करणार असून त्यात मोतुल, अमारॉन, सीएट यांचा समावेश आहे. ग्राहकांना दीर्घकालीन सेवा देण्याच्या बांधिलकीतून जावा येझ्दी मोटरसायकल्सने मोटरसायकलच्या मूल्यांकनावरून मोफत विस्तारित वॉरंटी देण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय एक्सचेंज मूल्य जाणून घेत अपग्रेडिंगमध्ये रस असलेल्या ग्राहकांसाठी ग्राहकांसाठी खास झोन तयार केला जाणार आहे.

आधीच्या सर्व्हिस कॅम्पना मिळालेला यशस्वी प्रतिसाद व त्यामध्ये करण्यात आलेले १००० पेक्षा जास्त जावा मोटरसायकल्सचे सर्व्हिसिंग लक्षात  घेत कंपनीने येत्या काही महिन्यांत वेगवेगळ्या शहरात मेगा सर्व्हिस कॅम्प्सचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून ब्रँडची ग्राहक समाधानाला प्राधान्य देण्याची व दर्जेदार ओनरशीप एक्सपिरियन्स देण्याची बांधिलकी दिसून आली आहे.

जावा येझ्दी मोटरसायकल्सच्या ग्राहकांन त्यांच्या जवळच्या ब्रँड वितरकाकडे आपला स्लॉट राखून ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. आपल्या मोटरसायकलचे दर्जेदार सर्व्हिसिंग करण्याची व सर्वोच्च ग्राहक समाधान मिळवण्याची ही संधी चुकवू नका.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading