Saturday, June 6, 2026
Latest NewsLIFESTYLE

डॉ. संपदा बेंडे, डॉ. ज्योती पाटील, डॉ. पारुल जैस्वाल, डॉ. तृप्ती रोकडे “मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र” स्पर्धेच्या विजेत्या

पुणे – पुण्यातील डॉ. संपदा बेंडे या मिस कॅटेगरी श्रेणीतील तर रॉयल श्रेणीमध्ये डॉ. ज्योती पाटील विजेत्या ठरल्या. क्लासिक श्रेणीत मुंबईतील डॉ. पारुल जैस्वाल तर सामाजिक कार्य श्रेणीत डॉ. तृप्ती रोकडे विजेत्या झाल्या. ‘मेडीक्वीन क्लब ग्लोबल’ या संस्थेकडून नुकतेच ‘मेडिक्वीन सौंदर्यवती स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा नुकतीच बालेवाडीतील हॉटेल ऑर्किड येथे संपन्न झाली. स्पर्धा विजेत्यांचा गौरव राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार जगदीश मुळीक, अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज, अभिनेते समीर धर्माधिकारी आणि सौरभ गोखले यांच्या हस्ते केला गेला. यावेळी मेडिक्वीनच्या संस्थापिका डॉ. प्रेरणा बेरी, सचिव डॉ. प्राजक्ता शहा उपस्थित होत्या.

वैद्यकिय क्षेत्रातील महिला डॉक्टरांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, महिलांमधील कर्करोग व एकंदरीत आरोग्य जनजागृतीसाठी ‘मेडीक्वीन क्लब ग्लोबल’ या संस्थेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेचे हे ५ वे पर्व होते. रॉयल श्रेणीमध्ये प्रथम उपविजेत्या – डॉ भावना नारंग (धारवाड कर्नाटक), द्वितीय उपविजेत्या – डॉ प्रीती भद्रनवर (पुणे) तर क्लासिक श्रेणीमध्ये पहिला उपविजेत्या डॉ अलका गोडबोले (ठाणे) आणि सामाजिक कार्य श्रेणीत डॉ तृप्ती रोकडे (ठाणे) विजेत्या झाल्या. ऑक्सीरीज कंपनी, क्रष्णा डायग्नोसिस हे या स्पर्धेचे प्रायोजक होते.

परीक्षक म्हणून डॉ. सोनाली पितळे, डॉ. ज्ञानदा बांदोडकर, डॉ. स्मृती हिंदरिया, तृप्ती खरोटे, डॉ. अमोल गित्ते, डॉ. उज्वला बर्दापूरकर यांनी काम पाहिले. कोरिओग्राफी अवि पायल यांनी केली तर सूत्रसंचालन महेश सोनी यांनी केले. सार्थ आयुर्वेद, निरवेद गिफ्टिंग पार्टनर होते. ॲटिट्यूट सिल्क साडी, VLCC संस्था, एमजे ज्वेलर्स, माईंड अँड बॉडी योगा इन्स्टिट्यूट यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

डॉ. प्रेरणा बेरी म्हणाल्या की, महिला डॉक्टरांचे सामाजिक कार्य, आत्मविश्वास, तंदुरुस्ती, आरोग्याच्या जागृतीसाठी तसेच त्यांच्यातील स्व: चा शोध घेण्यासाठी या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या माध्यमातून महिला डॉक्टरांना स्वत:ला पुरेसा वेळ देता येईल, त्याचबरोबर पुन्हा नव्या जोमाने व आत्मविश्वासाने दैनंदिन कामांना सुरुवात करता येईल यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. मेडिक्वीन हि केवळ एक सौंदर्य स्पर्धा नसून यामधे सहभागी डॉक्टरांचा सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील काम, कलागुण, फिटनेस,  छंद, कौशल्य या आशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading