रूट मोबाइल लिमिटेड बिलईझीच्या मदतीने आरसीएस बिझनेस मेसेजिंगच्या माध्यमातून महा मेट्रो पुणेमधील मेट्रो तिकिटिंगमध्ये बदल करणार
पुणे, रूट मोबाइल लिमिटेड (“रूट मोबाइल”), या उद्योग, ओव्हर दि टॉप (ओटीटी) ग्राहक आणि मोबाइल नेटवर्क ऑपरेटर्स (एमएनओ) यांना सेवा देणाऱ्या आघाडीच्या क्लाऊड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मने मुंबईस्थित इंटिग्रेशन भागीदार असलेल्या बिलईझी ई सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड (बिलइझी) सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमार्फत महा मेट्रो पुणेसाठी रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस (आरसीएस) बिझनेस मेसेजिंगद्वारे आगळावेगळा तिकीट खरेदी अनुभव दिला जाईल. ही नाविन्यपूर्ण उपाययोजना मेट्रो तिकीट खरेदी करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोपी करेल व प्रवाशांना एक चांगला तसेच कार्यक्षम प्रवासाचा अनुभव मिळू शकेल.
या धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून वापरकर्त्यांना महा मेट्रो पुणे ई-तिकिटे अँड्रॉइड फोनवरील थेट आरसीएस मेसेजेसद्वारे खरेदी करता येतील. ही सेवा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना क्यूआर कोड स्कॅन करून महा मेट्रो पुणेच्या अधिकृत आरसीएस अकाऊंटसोबत चॅट करावे लागेल. त्यासोबत ‘फ्रॉम’ आणि ‘टू’ स्थानकांचा पर्याय निवडण्यासारख्या, तिकिटांची संख्या साध्या सूचनांचे पालन करावे लागेल आणि त्यांच्या प्राधान्याच्या देय पद्धतींद्वारे (यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड) पेमेंट करावे लागेल. यशस्वी पूर्ततेनंतर वापरकर्त्याला क्यूआर कोडच्या माध्यमातून आरसीएस तिकीट मिळेल. ते हे तिकीट स्थानकात प्रवेश करताना दाखवून आपला प्रवास पूर्ण करू शकतात. हा संपूर्ण अनुभव स्थानिक आहे आणि त्यासाठी नवीन अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. तो मेसेजेस अॅपमध्ये काम करतो.
ज्या ठिकाणी हँडसेट आरसीएसला सपोर्ट करत नाहीत अशा संदर्भात वापरकर्ता प्रवास ओव्हर दि टॉप (ओटीटी) माध्यमांवर जातो. त्यामुळे तुम्हाला विनाअडथळा सेवा मिळते.
सध्या कस्टमर युजर ग्रुप (“सीयूजी”) तपासणी सुरू असल्यामुळे निवडक महा मेट्रो पुणे स्थानकांवर असलेले मेट्रो कर्मचारी प्रवाशांना क्यूआर कोड देऊन आरसीएस तिकीट खरेदी प्रवासाची सुविधा देतील. या सकारात्ममक दृष्टीकोनामुळे सहजसाध्यता वाढेल आणि पुणे मेट्रो वापरकर्त्यांसाठी नवीन तिकीट यंत्रणेमध्ये सहजपणे समाविष्ट होता येईल.
या विकासाबाबत बोलताना रूट मोबाइलचे व्यवस्थापकीय संचालक आणि ग्रुप सीईओ राजदीपकुमार गुप्ता म्हणाले की, “आरसीएस बिझनेस मेसेजिंगमार्फत मेट्रो तिकिटींगमुळे प्रवाशांचा रोजचा प्रवास आमूलाग्र बदलेल. हे आरसीएस मेसेजिंगवर तयार झालेले पहिलेवहिले तिकिटींग सोल्यूशन आहे. आमची रूट लॅबमधील विकास टीम सेवा सहजपणे उपलब्ध करून देणे, वेळ वाचवणे आणि पायाभूत सुविधांवरील ताण कमी करणे याद्वारे ग्राहकांचा प्रवासाचा अनुभव चांगला करण्यासाठी कार्यरत राहील”. ते पुढे म्हणाले की, “बिलइझी हा आमचा महत्त्वपूर्ण भागीदार आहे कारण ते सातत्याने डिजिटल उपाययोजनांमध्ये सुधारणा करून त्यांचा उपयोग करत आहेत. आरसीएसद्वारे तिकीट काढल्यामुळे सुलभता आणि विश्वासाचा स्तर उंचावेल. मी महा मेट्रो पुणेच्या प्रवाशांना या उपाययोजनेचा लाभ घेऊन प्रवासाचा एक नवीन मार्ग अनुभवावा असे आवाहन करतो”.
बिल इझीचे (Billeasy) संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश पाटील म्हणाले की, “आम्ही विविध उद्योग आणि शासकीय संस्थांसाठी डिजिटल बदलांना चालना देत आहोत. आमची रूट मोबाइलसोबतची भागीदारी आम्हाला एकूणच अनुभवात वाढ करून मोठ्या प्रमाणावरील ग्राहकांना एक सोपी आणि सहजसाध्य उपाययोजना देणे शक्य करते. त्यामुळे त्यांचे आयुष्य सोपे होईल.”
आरसीएस हे उद्योगात स्वीकारले गेलेले समृद्ध मेसेजिंग स्टँडर्ड असून त्याचा गुगलने स्वीकार केला आहे. त्यातून मीडिया, कागदपत्रे, इमोजी शेअर करणे यांच्यासारख्या व्यक्तीपासून व्यक्तीकडे चॅट क्षमता समाविष्ट करून साध्या टेक्स्ट मेसेजिंगपासून रिच मेसेजिंगपर्यंत वापरकर्ता अनुभव सुधारला जातो. त्याचबरोबर उद्योग आणि वापरकर्ता यांच्यातील संवादाद्वारे व्यवहार केला जातो. सध्या आरसीएस ५.० आणि त्यानंतरच्या आवृत्ती असलेल्या सर्व अँड्रॉइड फोन्ससाठी वापरले जाऊ शकते. अॅपलने देखील २०२४ मध्ये आरसीएस मेसेजिंगला सपोर्ट जाहीर केला आहे.
