Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विज्ञान दिन उत्साहात साजरा


पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ येथील पूर्व प्राथमिक विभागात विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञानाबरोबरच, मराठी, संस्कृत, इंग्रजी आणि गणिताचे प्रकल्प तसेच शैक्षणिक साहित्य मांडण्यात आले होते. या प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या प्रबंधक डॉ. सविता केळकर यांनी केले. असे उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतात असे त्यांनी सांगितले आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त पालकांसाठी मराठी प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading