केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एआरआरसी २०२४ सीझनसाठी इंडियन ऑइलच्या सानुकूलित इंधनाला झेंडा दाखवला
पुणे : केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री श्री. हरदीप सिंग पुरी यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), नावा शेवा येथून एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप (एआरआरसी) २०२४ सीझनसाठी इंडियन ऑइलने विशेष तयार केलेल्या ‘स्टॉर्म’ या सानुकूल इंधनाला व्हर्च्युअली झेंडा दाखवला. रेसिंग सर्किटमधील प्रीमियम सुपरबाइकसाठी इंडियन ऑइलने उच्च क्षमतेचे अल्टीमेट रेसिंग फ्यूएल विशेषरित्या विकसित केले आहे आणि या फ्यूएल ला जागतिक स्तरावरील रेसिंग इव्हेंटमध्ये चॅम्पियन्सचे इंधन म्हणून स्थान दिले जाईल.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन, इंडियन ऑइलचे अध्यख श्रीकांत माधव वैद्य आणि इंडियन ऑइलचे संचालक (विपणन) व्ही. सतिश कुमार हे झेंडा दाखवण्याच्या समारोहा दरम्यान उपस्थित होते.
प्रीमियम इंधनाला झेंडा दाखवताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की, इंडियन ऑइलने प्रथमच गुजरात रिफायनरीमधून स्टॉर्म नावाच्या श्रेणी २ रेस इंधनाचे उत्पादन सुरू केले आहे. हे रेस इंधन, तसेच इतर ऑफरिंग्ज जसे एव्ही गॅस १०० एलएल, रेफरन्स इंधन आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यांचे काटेकोरपणे पालन करतात, तसेच भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने प्रयत्नांशी संलग्न आहेत.
जैन यांनी उत्कृष्ट मानकांची आवश्यकता असण्यासह उल्लेखनीय कार्यक्षमता देणारी सर्वोत्तम उत्पादने विकसित करण्यासाठी इंडियन ऑइलच्या क्षमतांचे कौतुक केले. ते म्हणाले, या उत्पादन पोर्टफोलिओमधून निदर्शनास येते की इंडियन ऑइल जागतिक दर्जाची कंपनी आहे, जी ग्राहकांच्या सर्वसमावेशक व भावी मागण्यांनुसार सोल्यूशन्स देऊ शकते.
याप्रसंगी एस. एम. वैद्य यांनी जागतिक स्तरावर नवीन उद्योग बेंचमार्क्स स्थापित करणारी जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करण्यामध्ये कंपनीच्या शाश्वत यशाबाबत सांगितले. ते म्हणाले, ”इंडियन ऑइलला इन-हाऊस संसाधनांचा फायदा घेत अल्टिमेट रेसिंग इंधन ‘स्टॉर्म’ लाँच करण्याचा अत्यंत अभिमान वाटत आहे. आम्हाला विश्वास आहे की, इंडियन ऑइल ‘स्टॉर्म’ अपवादात्मक कार्यक्षमता प्रदान करेल आणि रोमांचक रेसिंग अनुभवाप्रती योगदान देईल, ज्यासाठी हे चॅम्पियन्स ओळखले जातात. आज आदरणीय मंत्री महोदयांकडून या इंधनाचे सादरीकरण मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या मिशन्सच्या दिशेने आमच्या सहयोगात्मक प्रयत्नामधील आणखी एक बेंचमार्क ठरेल.”
पूर्णत: भारतात उत्पादित करण्यात आलेल्या ‘स्टॉर्म’चे लाँच आत्मनिर्भरता आणि ‘मेक इन इंडिया’ मिशनच्या उत्साहाला अधिक चालना देते. एफआयएमसोबतच्या सहयोगामधून प्रखर आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करणारी प्रगत ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स विकसित करण्यामधील भारताची क्षमता दिसून येते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची उपस्थिती अधिक दृढ होते. ही सर्वोत्तम ऑफरिंग आधुनिक ऑटोमोबाइल्सना एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप सारख्या प्रतिष्ठित रेसिंग इव्हेण्ट्समध्ये प्रेरित करेल, ज्यामुळे भारताचा तंत्रज्ञान स्वावलंबीपणा व सर्वोत्तमतेच्या दिशेने प्रवास अधिक प्रबळ होईल.
इंडियन ऑइल एक्स्पी१००, एक्सपी९५ यांसारखे अशाच प्रकारचे उच्च क्षमतेचे इंधन, तसेच रेफरन्स गॅसोलाइन व डिझेल आणि एव्हिएशन फ्यूएल एव्ही गॅस १०० एलएल यांसारखे अत्यंत सर्वोत्तम इंधन यांचे विपणन करत आहे, ज्यांची ग्राहकांनी खूप प्रशंसा केली आहे.
एफआयएम (फेडरेशन इंटरनॅशनल डी मोटरसायकलिझम) ही मोटरसायकल रेसिंगसाठी जागतिक प्रशासकीय संस्था आहे, जी रोड रेसिंग, मोटोक्रॉस, ट्रायल्स, एण्ड्युरो अशा विविध मोटरसायकल रेसिंग इव्हेण्ट्सवर देखरेख ठेवते, तसेच मोटोजीपी, मोटो२ व मोटो३ इव्हेण्ट्स व्यतिरिक्त दरवर्षी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) चे आयोजन करते. एआरआरसी आशिया-पॅसिफिक प्रांतातील विविध देशांमधील राइडर्स व टीम्सचे लक्ष वेधून घेते.
