Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

व्यावसायिक प्रशिक्षण अथवा नोकरीनिमित्त जर्मनीमध्ये स्थायिक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : जर्मनीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण अथवा नोकरीनिमित्त जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी पुण्यातील ग्योथं इन्स्टिट्यूट – मॅक्स म्युलर भवन यांच्या वतीने येत्या रविवार दि. ३ मार्च रोजी सकाळी ९. ३० वाजता एका विशेष अशा माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बोट क्लब रस्ता येथील ग्योथं इन्स्टिट्यूट – मॅक्स म्युलर भवन या संस्थेच्या आवारात सदर कार्यक्रम संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

जे नागरिक नजीकच्या भविष्यात आपल्या कामानिमित्त जर्मनी येथे स्थायिक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये ग्योथं इन्स्टिट्यूट, विद्यार्थी आणि संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी निधी देणारी सर्वांत मोठी संस्था म्हणून सर्वपरिचित असलेली डीएएडी आणि इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रोरेकग्नीशन यांची माहितीपर सादरीकरणे होतील. याशिवाय जर्मनीमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती देणारी अशी तज्ज्ञांची चर्चासत्रे हे देखील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल, अशी माहिती ग्योथं इन्स्टिट्यूटच्या वतीने कळविण्यात आली आहे.          

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading