Saturday, June 13, 2026
Latest News

जॅक एन जील प्रीस्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

सरस्वती शिक्षण संस्था संचालित जॅक एन जील प्री स्कूल, विरार Jack N Jill Pre-school(Virar East & West), या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ रोजी अण्णासाहेब वर्तक सभागृह येथे पार पडले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.प्रेमनाथ ठोंबरे साहेब,अध्यक्ष कुणबी चेंबर ऑफ काॅर्मस( Pricident KCCI) ,श्री.प्रकाश भोस्तेकर ,सेक्रेटरी, कुणबी चेंबर ऑफ काॅर्मस ( secretary KCCI), श्री सचिन धामणे ( उद्योजक),

संस्थेचे विश्वस्त श्री. शिवाजी बापेरकर, मान्यवर व पालक उपस्थित होते.

 

या प्रसंगी मनोरंजनाचा सुंदर व संस्कारमय कार्यक्रम

 वर्ल्ड ऑफ इंनोसस्न (World of innocence), प्राउड टू बी इंडियन (Proud to be Indian), मराठी पाऊल पडती पुढे ,ह्या आशयाचा कार्येक्रम विदयार्थी, शिक्षक व पालक यांनी सादर केला. ह्या सुंदर सादरीकरणाने उपस्थितांच्या विद्यार्थि जीवनाच्या आठवणी जाग्या झाल्या.

 

 ही शाळा 2011 पासून विरार येथे संस्कारक्षम शिक्षण व  खेळता खेळता शिक्षण (Playway Method) शिक्षणपद्धतीसाठी प्रसिद्ध असून शाळेच्या प्रिन्सिपल सौ संध्या शाम बापेरकर यांनी यासाठी स्वतःचा अभ्यासक्रम (Syllabus)

 प्रकाशित केला असुन दर्जेदार व प्रभावी शिक्षण देवून विद्यार्थ्यांची भावी पिढी तयार करण्याचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांच्या या दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे शाळेचा  बोरिवली , राजापूर, तुळजापूर येथेही शाखा विस्तार झालेला आहे.

महाराष्ट्रभर शाळेच्या शाखा वाढवून शिस्तबध्द, संस्कारमय व दर्जेदार शिक्षण सर्वसामान्य वर्गातील समाजापर्यंत पोचविण्याचा मानस संस्थेचे सेक्रेटरी श्री. शाम बापेरकर व सौ संध्या बापेरकर यांनी या प्रसंगी व्यक्त केला. या पवित्र कार्यासाठी संस्थेला, 

सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देवुन मान्यवरांनी सर्वांना शुभेच्या दिल्या .

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading