विधानसभेमध्ये ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
पहिल्या दिवशी तीन विधेयके सादर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2024 मांडले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक 2024 आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले.
ज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला.
विधानसभेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
दिवंगत विधनसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी , तसेच विधानसभा सदस्य राजेंद्र सुखानंद पाटणी यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दिवंगत सदस्यांच्या कार्याला अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी उजाळा दिला. यावेळी सर्व सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.
