Monday, June 1, 2026
Latest NewsPUNE

रक्तदान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : श्रीराम तरुण मंडळ खिलारेवाडी, दक्षिण मुखी मारुती मंदिर, श्री मारुती मित्र मंडळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व संजय बलकवडे, भास्कर बलकवडे यांच्या वतीने शिवसेनेचे माजी नगरसेवक स्व. राजा बलकवडे यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन खिलारेवाडी, कर्वे रस्ता येथे करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे ५८  रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

शिबिराचे उदघाटन कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, कोथरूडचे मा. आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते स्व. राजा बलकवडे यांच्या प्रतिमेला वंदन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी दिलीप गायकवाड, राजू रावडे, विष्णू माझिरे, अविनाश बलकवडे, हेमंत धनवे, ऋषीकेश मारणे, कांता हुलावळे, कृष्णा दहिभाते आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार धंगेकर, मा. आमदार मोकाटे, शहरप्रमुख थरकुडे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी हनुमंत दगडे, देविदास दहिभाते, राम बाटुंगे यांच्यासह वर्तक बाग ओंकार ग्रुप यांनी मोलाचे योगदान दिले. या शिबिरासाठी रेड प्लस रक्तपिढीचे सहाय्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading