Monday, June 1, 2026
Latest NewsSports

एसकॉन प्रोजेक्ट्स, मिलेनियम इंजीनिअर्स संघांची विजयी सलामी

‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा
पुणे : रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे आयोजित ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एसकॉन प्रोजेक्ट्स संघ आणि मिलेनियम इंजीनिअर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुनावळे येथे सुरू असलेल्या स्पर्धेत केदार जाधव याच्या नाबाद ५५ धावांच्या खेळीच्या जोरावर एसकॉन प्रोजेक्ट्स संघाने रोहन बिल्डर्स इलेव्हनचा ५ गडी राखून सहज विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहन बिल्डर्स इलेव्हनने ७० धावा धावफलकावर लावल्या. निखील येनपुरे याने ४४ धावांची खेळी केली. निलेश बनकर (२-९) आणि आशिष साळुंखे (२-१५) यांनी चमकदार गोलंदाजी करून एसकॉन संघाच्या डावाला रोखले. हे आव्हान एसकॉन प्रोजेक्ट्स संघाने ५ षटकात पूर्ण केले. केदार जाधव याने १८ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५५ धावांची स्फोटक खेळी केली. रिषी पठारे याने नाबाद १७ धावांचे योगदान देत संघाचा विजय साकार केला.

वैभव चव्हाण याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मिलेनियम इंजीनिअर्स संघाने रत्नरूप थंडर्सचा ८ गडी राखून सहज पराभव करून विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रत्नरूप थंडर्स संघाला १० षटकात ४६ धावांचे आव्हान उभे केले. सुरज तुपे याने २१ धावांची खेळी केली. वैभव चव्हाण याने ६ धावात २ गडी बाद केले. वैभव चव्हाण (नाबाद २० धावा) आणि सुर्यकांत परीदा (१७ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर मिलेनियम इंजीनिअर्स संघाने ३.४ षटकात व २ गडी गमावून विजय मिळवला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
रोहन बिल्डर्स इलेव्हनः १० षटकात ९ गडी बाद ७० धावा (निखील येनपुरे ४४, विनोद कुमार १८, निलेश बनकर २-९, आशिष साळुंखे २-१५) पराभूत वि. एसकॉन प्रोजेक्ट्स संघः ५ षटकात बिनबाद ७४ धावा (केदार जाधव नाबाद ५५ (१८, ३ चौकार, ६ षटकार), रिषी पठारे नाबाद १७); सामनावीरः केदार जाधव;

रत्नरूप थंडर्सः १० षटकात ७ गडी बाद ४६ धावा (सुरज तुपे २१, योगेश मोरटळे १०, वैभव चव्हाण २-६, राहूल बाबर १-२) पराभूत वि. मिलेनियम इंजीनिअर्सः ३.४ षटकात २ गडी बाद ४७ धावा (वैभव चव्हाण नाबाद २०, सुर्यकांत परीदा १७); सामनावीरः वैभव चव्हाण.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading